मुंबई : बॉलिवूड अभिनेता आर. माधवनची खास लव्हस्टोरी त्याच्या वाढदिवसनिमित्त पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्याच्या अभिनया इतकीच त्या लव्हस्टोरी अनोखी आहे. माधवनचा जन्म १ जून १९७० रोजी जमशेदपूर येथे झाला होता. त्याला अभ्यासाक्रम पूर्ण केल्यानंतर सैन्यात भारती व्हायचे होते. मात्र तो पुढे मनोरंजन विश्वाकडे वळला.
माधव त्याच्याच विद्यार्थिनीच्या प्रेमात पडला होता आणि ती आज त्याची पत्नी आहे. आर. माधवन आणि त्याची पत्नी सरिताची लव्हस्टोरी इतरांपेक्षा थोडीशी हटके आणि इंटरेस्टिंग आहे. अभ्यासात हुशार असलेल्या माधवनने त्यासोबत अनेक छंदही जोपासले होते. इलेक्ट्रॉनिकची डिग्री घेतल्यानंतर माधवनने कम्युनिकेशन आणि पब्लिक स्पिकिंग क्लासेस घ्यायला सुरुवात केली.
https://www.instagram.com/p/B8iU2YbjiiA/?utm_source=ig_embed&ig_rid=9751da30-5797-4adc-bc56-d509f809fe96
याच क्लासमध्ये माधवन आणि सरिताची भेट झाली. १९९१ मध्ये सरिता एअरहोस्टेसच्या नोकरीसाठी प्रयत्न करत होती. त्यानंतर सरिता आभार मानण्यासाठी आर माधवनला डिनरसाठी घेऊन गेली. येथूनच या दोघांची मैत्री सुरू झाली आणि काही दिवसातच दोघांच्या मैत्रीमध्ये प्रेम फुलू लागले. या जोडीने बरीच वर्ष एकमेकांना डेट केले आणि त्यानंतर दोघांचे लग्न झाले. आर माधवन आणि सरिता यांना वेदांत नावाचा एक मुलगा देखील आहे.
सूरुवातीला माधवनने जाहिरातीमध्ये काम केले. ‘इस रात की सुबह नही’ या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण त्याला खरी ओळख मिळाली ती सुपरहिट फिल्म ठरलेल्या ‘रेहाना है तेरे दिल मे’ या फिल्ममधून मिळाली. त्यानंतर त्याने बरेच सुपरहिट चित्रपट केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- हेरगिरीचे ट्वीट संभाजीराजेंकडून मागे; वळसे पाटलांच्या फोनमुळे निवळला वाद
- बेस्ट उपक्रमाला पूर्णवेळ महाव्यवस्थापक द्या; भाजपची जोरदार मागणी
- मोठी बातमी : ‘या’ बँकेचा परवाना आरबीआयने केला रद्द
- ‘…म्हणून शरद पवारांना भेटलो,’ देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान
- ‘चाहत्यांमुळेच क्षेत्ररक्षणात इतरापेक्षा सरस’ जडेजाने केला खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

