मुंबई : आयपीएल स्थगीतीनंतर काही दिवसातच बीसीसीआयने इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. या दौऱ्यात भारतीय संघाला जागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. यानंतर इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्याची मालिका खेळायची आहे.
जागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघ २ जुन रोजी भारतातून रवाना होणार आहे. यादरम्यान या सामन्याविषयी अनेक मान्यवर आपले तर्क वितर्क व्यक्त करत आहे. यात आता भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांचा समावेश झाला आहे. त्यांनी या सामन्यातील विजयासाठी भारतीय संघ प्रबळ दावेदार असल्याचे मत मांडले आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले की,’ भारतीय संघ हा अंतिम सामन्यात जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. यापूर्वी देखील अनेक विक्रम केलेल्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ जागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेचे विजेतेपद पटकावून इतिहास रचेल.’ असे ते म्हणाले.
यावर्षी ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात पराभूत केल्याने भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. तसेच भारतीय संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचे मिश्रण आहे, मात्र प्रतिस्पर्धी संघ न्यूझीलंडला या सामन्यात एका फिरकीपटूची कमी जाणवू शकते. असे ते म्हणाले. या महिन्यात १८-२२ जुन दरम्यान भारत आणि न्युझीलंड संघादरम्यान जागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पुन्हा अशीच गर्दी होत राहिल्यास निर्बंध अधिक कठोर केले जातील; मुख्यमंत्र्यांचा इशारा
- अभिनेता जॅकी भगनानी याच्यासह इतर आठ जणांनी लैंगिक छळ केल्याचा मॉडेलने केला आरोप
- ‘पुढची 100 वर्षे तुमची सत्ता येणार नाही, हे पवारांनी फडणवीस यांना सांगितले असेल’ट
- अभिनेता आर माधवनची एक खास लव्हस्टोरी…, विद्यार्थिनीशीच केले लग्न
- आयसीसीची आज महत्वाची बैठक; टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनावर होणार चर्चा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

