मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्राला अश्लील चित्रपटांची निर्मिती करुन मोबाईल अॅपवर प्रदर्शित केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. फेब्रवारी महिन्यात मुंबई पोलिसांकडे त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. याच प्रकरणात राज कुंद्राला १९ जुलै रोजी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. यानंतर अनेकांनी राज कुंद्राविरोधात विविध आरोप करायला सुरुवात केली.
अभिनेत्री गहना राज कुंद्राच्या अटकेनंतर धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यापैकी एक म्हणजे ‘हॉटशॉट्स’ला पर्याय म्हणून राज कुंद्रा एक नवीन अॅप लॉन्च करणार होता. या अॅपवरील चित्रपटासाठी त्यानं शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी आणि मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरच्या नावाचा विचार केला होता, असा दावा तिनं केला आहे.
मात्र गहनाच्या या आरोपानंतर यात काहीही तथ्य नसल्याचं सई ताम्हणकरनं म्हंटलं आहे. राज कुंद्रा प्रकरण आणि त्याच्या कोणत्याही अॅपचा काहीही संबंध नसल्याचं सईनं स्पष्ट केलं आहे.
या प्रकरणात राज कुंद्राला कोर्टाने २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यांनतर झालेल्या सुनावणीत राज कुंद्रा आणि रायन थॉर्पे यांना आणखी पुढील 7 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘संकटाच्या काळात जनतेला पाठ दाखवणारे अनिल परब हे पळकुटे मंत्री’
- दोन मुलांचे धोरण देशभरात राबवणार का?, केंद्राने संसदेत दिले ‘हे’ उत्तर
- ‘डोक्यावर मृत्यू दिसत असूनही नागरिकांना मरणासाठी का सोडले?, भाजपाचा संतप्त सवाल
- ‘राज्यावरील संकटात मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा अर्थ म्हणजे ‘मला जमत नाही!’
- अतिवृष्टीग्रस्त भागातील नागरिकांना आता मदतीचा ओघ सुरु, निलेश राणेंचा पूरग्रस्तांना मदतीचा हात


