मुंबई : भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यानंतर बीसीसीआयने भारतीय संघाची इंग्लंड दौऱ्यासाठी घोषणा केली. या दौऱ्यात पहिले भारतीय संघ जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळेल. १८ ते २२ जुन दरम्यान साउथहॅप्मटन येथे भारत आणि न्युझीलंड संघादरम्यान ही लढत होईल. यानंतर ऑगस्ट महिन्यात इंग्लंड संघासोबत ५ कसोटी सामन्याची मालिका खेळणार आहे.
भारतीय क्रिकेट टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलसाठी लंडनला पोहोचली आहे. केएल राहुलने गुरुवारी विमानाजवळचा आपला फोटो शेयर केला आणि आपण लंडनला पोहोचल्याचं सांगितलं. इंग्लंड पोहोचल्यानंतर भारतीय टीमला क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. इंग्लंडला रवाना होण्याआधीही भारतीय टीम मुंबईमध्ये क्वारंटाईन होती.
https://www.instagram.com/p/CPpl9jNAIqj/?utm_source=ig_web_copy_link
न्यूझीलंडविरुद्धच्या फायनलआधी टीम इंडियाला फक्त 4 सराव सत्र मिळणार आहेत. तर न्यूझीलंडची टीम या मुकाबल्याआधी इंग्लंडविरुद्ध दोन टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे, त्यामुळे किवी खेळाडूंचा ड्युक बॉलने चांगला सराव होणार आहे. . वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल ड्युक बॉलने खेळवली जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘धोकादायक व्हेंटिलेटर्स बदलावेच लागतील’, औरंगाबाद खंडपीठाचे निर्देश
- ‘ओ परबांनू मंत्री पदाचो राजीनामो आजच देऊन टाका.. उगाच उद्या ‘इज्जत’ जावुक नको..!’
- ‘सरकारने शरियत कायद्यामध्ये हस्तक्षेप केल्याने करोना आणि चक्रीवादळांसारख्या आपत्ती आल्या’
- ‘लसीकरणाबाबत केंद्राची पॉलिसी स्पष्ट नाही; रोज नवीन नियमांची होतेय घोषणा’
- ‘ते ट्विट मी केलं नव्हतं तर…’ सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर महापौरांची सारवासारव


