औरंगाबाद : नादुरुस्त व्हेंटिलेटर्सप्रकरणी उच्च न्यायालय खंडपीठाला आवश्यक वाटल्यास हे व्हेंटिलेटर्स परत करण्याचे निर्देशही देण्यात येतील आणि अशा परिस्थितीत हे व्हेंटिलेटर्स बदलून नवीन आणि कार्यक्षम व्हेंटिलेटर्स प्राप्त करण्याची जबाबदारी केंद्र शासनाची असेल, असे औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. बी. यू. देबडवार यांनी स्पष्ट केले. या प्रकरणी केंद्र शासनाने आता ठाम भूमिका घ्यायलाच हवी. रुग्णांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकेल, असे व्हेंटिलेटर्स वापरण्यास आम्ही परवानगी देऊ शकत नाही, असेही खंडपीठाने नमूद केले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्वत:हून दाखल करून घेतलेल्या फाैजदारी याचिकेच्या सुनावणीप्रसंगी केंद्र सरकारचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिलसिंग यांनी ही माहिती दिली. न्या. रवींद्र घुगे व न्या. बी. यू. देबडवार यांनी तज्ज्ञांचा अहवाल ७ जून रोजीच्या सुनावणीप्रसंगी ठेवण्याचे आदेश दिले. व्हेंटिलेटर्स नादुरुस्त असतील आणि या उत्पादनात दोष असल्याने वॉरंटी योजनेचा लाभ घेता येऊ शकतो, असे नमूद करून अशा व्हेंटिलेटर्समुळे दुर्दैवाने काही बरेवाईट झाले तर कुणाला जबाबदार धरणार, अशी शंका खंडपीठाने उपस्थित केली. केंद्र सरकारकडून मिळालेल्या व्हेंटिलेटर्सची एचएचएल लाइफ केअर कंपनीच्या २६ जणांच्या पथकाने २९ मे रोजी पाहणी केली. याचा अहवाल सरकारी वकील ज्ञानेश्वर काळे यांनी खंडपीठात सादर केला.
अतिरिक्त दर आकारणाऱ्या रुग्णवाहिनी चालकांवर कारवाई
रुग्णांच्या नातेवाइकांना जास्तीचे भाडे आकारणाऱ्या रुग्णवाहिनी चालकांविरुद्ध कारवाईसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांतर्फे म्हणणे सादर करण्यात आले, की प्रत्येक रुग्णवाहिकेवर आता आरटीओने निश्चित केलेले दरपत्रक लावणे बंधनकारक केले आहे. त्याचे उल्लंघन करणाऱ्यांना कायद्यानुसार दंड आकारण्यात येईल. त्यावर खंडपीठाने यासंदर्भात एक सक्षम समितीची स्थापना करण्याचे तसेच आरटीओ यांनी अचानक तपासणी करून दरपत्रकांचे उल्लंघन करणाऱ्यावर तसेच ॲम्ब्युलन्सवर दरपत्रक नसलेल्या व फाडून टाकणाऱ्यावर कारवाई करावी, असे निर्देश दिले.
महत्वाच्या बातम्या
- ‘ओ परबांनू मंत्री पदाचो राजीनामो आजच देऊन टाका.. उगाच उद्या ‘इज्जत’ जावुक नको..!’
- ‘सरकारने शरियत कायद्यामध्ये हस्तक्षेप केल्याने करोना आणि चक्रीवादळांसारख्या आपत्ती आल्या’
- ‘लसीकरणाबाबत केंद्राची पॉलिसी स्पष्ट नाही; रोज नवीन नियमांची होतेय घोषणा’
- ‘ते ट्विट मी केलं नव्हतं तर…’ सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर महापौरांची सारवासारव
- ‘उद्धवजी… नाकाने कांदे सोलू नका… मराठा समाजाच्या हिताची भूमिका घ्या’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

