मुंबई – मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या कालपासून नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहेत. पेडणेक यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. ही मुलाखत त्यांनी आपल्या ट्विटरला शेअर केली होती. या मुलाखतीत त्यांनी एक कोटी लोकांना लस देण्यासंदर्भात पालिकेकडून काढण्यात आलेल्या ग्लोबल टेंडर तसंच त्याला कंपन्यांनी दिलेल्या प्रतिसादाचा उल्लेख केला होता.
या ट्विटवर एका व्यक्तीने कंत्राट कोणाला दिले? असा प्रश्न विचारला होता. यावर किशोरी पेडणेकर यांनी उत्तर देताना ‘तुझ्या बापाला’ असं म्हटलं होतं. हे ट्विट व्हायरल होऊ लागल्यानंतर महापौरांवर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली. सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागल्यानंतर महापौरांनी अखेर हे ट्विट डिलीट केलं.
The lady in below tweet is Mumbai Mayor @KishoriPednekar
When asked who got the Vaccination Contract in @mybmc
She answers "तुम्हारे बाप को "
This is an insult to all #Mumbaikars waiting for Vaccination #ShivSenaInsultsMumbaikars pic.twitter.com/nif3GztZi7
— Devang Dave (@DevangVDave) June 2, 2021
दरम्यान या संपूर्ण वादावर आता किशोरी पेडणेकर यांनी स्पष्टीकरण दिलं असून ते ट्विट आपण नाही तर शिवसैनिकाने केलं होतं असं सांगत सारवासारव केली आहे. विशेष म्हणजे या शिवसैनिकाची हकालपट्टी करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
किशोरी पेडणेकर यांचे स्पष्टीकरण
बीकेसीत मी एका कार्यक्रमासाठी गेले होते. यावेळी माझ्यासोबत शाखाप्रमुख आणि दोन कार्यकर्ते होते. कार्यक्रम असताना मी मोबाइल माझ्याकडे ठेवत नाही. तसंच माझ्या मोबाइलला लॉक नसतो. मोबाइल पाहत असताना शिवसैनिकाने हे ट्विट केलं होतं.
ते ट्विट पाहिल्यानंतर ही मोठी चूक झाल्याचं माझ्या लक्षात आलं. आपल्याशी कोणी कितीही वाईट वागलं तरी आपण तसं वागू नये या मताची मी आहे. मी कधीही गैरवर्तन करत नाही. मी तात्काळ ते ट्विट डिलीट केलं. तसंच त्या मुलाला परत माझ्याकडे यायचं नाही असं सांगितलं.
महत्वाच्या बातम्या
- कौतुकास्पद : जागतिक बँकेचे शिक्षण विषयक सल्लागार म्हणून डिसले गुरुजी यांची नियुक्ती
- संजय राऊतांच ‘ते’ आमंत्रण आम्ही स्वीकारतो; आशिष शेलारांच्या विधानाने उत्सुकता वाढली
- ऱ्हदयद्रावक! मायलेकीसह पुतणीचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू
- ‘उद्धवजी… नाकाने कांदे सोलू नका… मराठा समाजाच्या हिताची भूमिका घ्या’
- ट्वीटर युजरचा ‘बाप’ काढणं महापौरांना पडलं महागात, सोशल मीडियावर होताहेत ट्रोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

