मुंबई : शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार दाखल झाल आहे. यानंतर भारतीय जनता पक्षाने त्यांच्याविरोधात रान पेटवले आहे. किरीट सोमैय्यांनी तर अनिल देशमुख यांच्यानंतर परब यांचाच ‘नंबर’ असल्याचा दावा केला. त्यात आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनीही अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. राणे यांनी कोकणी भाषेत परबांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली. ते ही कोकणी भाषेत.
काही दिवसांपूर्वी सचिन वाझे प्रकरणातही अनिल परब यांच्यावर आरोप झाले होते. त्यानंतर नाशिक येथील परिवहन कर्मचाऱ्यांने अनिल परब यांच्याविरोधात तक्रार दिली. यावर नितेश राणेंनी ट्विट केलेय. त्यात ते म्हणतात की, ‘ओ परबांनू, मंत्री पदाचो राजीनामो आजच देऊन टाका. उगाच उद्या इज्जत जावुक नको. आजच उरलीसुरली लाज वाचवा. आयकतास ना’ असा टोला अनिल परब यांना लगावला आहे.
ओ परबांनू मंत्री पदाचो राजीनामो आजच देऊन टाका..
उगाच उद्या "इज्जत" जावुक नको..!
आजच उरलीसुरली "लाज" वाचवा…
आयकतास ना ..!!— Nitesh Rane (@NiteshNRane) June 3, 2021
काय आहे प्रकरण?
गजेंद्र पाटील यांनी १६ मे रोजी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. ते नाशिक येथे मोटार वाहन निरिक्षक होते. पोलीस आयुक्त दीपक पांडये यांनी आता या तक्रारीची दखल घेत, सखोल चौकशी करण्याचे आदेश गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तांना दिले आहेत. उपपरिवहन अधिकारी बजरंग खरमाटे हे परिवहन विभागाच्या राज्यभरातील बदल्या मॅनेज करतात, त्यासाठी कसे अर्थपूर्ण व्यवहार चालतात, त्याची माहिती तक्रारीत देण्यात आली आहे. परिवहन मंत्री अनिल परब हे बजरंग खरमाटेना संरक्षण देतात, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
सूडबुद्धी आणि राजकीय हेतूने माझ्याविरोधात तक्रार
‘निलंबित मोटार वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी माझ्याविरुद्ध तसेच परिवहन आयुक्त व इतर पाच अधिकाऱ्यांविरोधात पंचवटी पोलीस स्टेशन, नाशिक येथे दिलेली तक्रार ही पूर्णतः निराधार व खोटी आहे’ असं परब यांनी म्हटलं आहे. ‘विभागातील अनेक तक्रारींच्या पार्श्वभूमीवर निलंबित झालेल्या अधिकाऱ्याने सूडबुद्धीने खोटे आरोप करून माझी व महाविकास आघाडी सरकारची बदनामी करण्याचे षडयंत्र आखले आहे’ असा आरोप अनिल परब यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘सरकारने शरियत कायद्यामध्ये हस्तक्षेप केल्याने करोना आणि चक्रीवादळांसारख्या आपत्ती आल्या’
- ‘लसीकरणाबाबत केंद्राची पॉलिसी स्पष्ट नाही; रोज नवीन नियमांची होतेय घोषणा’
- ‘ते ट्विट मी केलं नव्हतं तर…’ सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर महापौरांची सारवासारव
- ‘उद्धवजी… नाकाने कांदे सोलू नका… मराठा समाजाच्या हिताची भूमिका घ्या’
- अंकिता लोखंडेचा चाहत्यांना ‘गुड बाय’ ; पोस्ट शेअर करत दिली माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

