मुंबई : आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षण बाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकारण तापलं आहे. या वादात अनेक नेत्यांनी सहभाग घेतला आहे. अशातच सावंत यांच्या मतसंघात त्यांच्या विरोधात लढलेल्या राहुल मोटे यांनी देखील या वादात उडी घेतली असून सावंतांनी असं एकदाच म्हटलं नसल्याचं सांगितलं आहे.
वादग्रस्त वक्तव्य करण्याची सावंत यांची ही केवळ आताची वेळ नाहीतर यापूर्वीही अनेकवेळा झाले आहे, समाजात तेढ निर्माण होईल, महाराष्ट्राचा अवमान होईल अशी भाषा त्याच्या भाषणातून वारंवार होत असते, असं मोटे यांनी म्हटलं आहे.
याआधी देखील महाराष्ट्राला भिकारी बनवेन पण तानाजी सावंत भिकारी होणार नाही, अशा प्रकारचे विधान करत महाराष्ट्राचा अपमान केला होता, असा आरोप मोटेंनी केला आहे. त्या सर्व वक्तव्यांची याठिकाणी तपासणी होणं गरजेचं आहे, शिवाय हे धाडस होतेच कसं असा सवाल मोटे यांनी केला आहे.
दरम्यान, राज्याच्या मंत्रीपदी विराजमान असताना सावंतांना भाषा कोणती वापरावी याचं ज्ञान त्यांना नाही, त्यामुळे राज्याचा सोडा आमच्या भूम-परंडा-वाशी मतदार संघाचं काय होणार याची चिंता असल्याचं मोटे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंना ‘ती’ एक चूक महागात पडणार? ; शिंदे गटाच्या वकिलांचा महत्वाचा युक्तिवाद!
- Health Tips | तुमच्या हाताची बोट दुखत असतील तर करा ‘ हे ‘ उपाय
- Dadasaheb Phalke Award | सिने सृष्टीतील तारिका आशा पारेख यांना दिला जाणार ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’
- Uddhav Thackeray | “कितीही अफझल खान आले, तरी…”, उद्धव ठाकरेंची अमित शहांवर टीका
- Shivsena VS Shinde | शिंदे गटाकडून नीरज कौल यांचा कोर्टात महत्वाचा युक्तीवाद, समोर ठेवले ‘हे’ मुद्दे


