🕒 1 min read
Shinde vs Thackeray | बुलढाणा : आज बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा स्मृतीदिन आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी काल रात्री (बुधवार) बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) स्मारकाला भेट दिली. यावेळी भाजपनेते देखील उपस्थित होते. त्यांनी बाळासाहेबांना अभिवादन केला. त्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कार्यकर्त्यांनी स्मारकाला गोमूत्राने धुतले. त्यामुळे राजकीय खळबळ माजली आहे. शिंदे गटातील नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटावर टीका करत आहेत.
शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी थेट मोतोश्रीवर टीका केली आहे. “काल एकनाथ शिंदे (Eknath Shinde) तसेच आमदार खासदारांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले आणि प्रार्थना केली. मात्र उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटाच्या काही नेत्यांनी गोमूत्र शिंपडून स्थळ अपवित्र झालं म्हणून शुद्ध करण्याचा प्रकार केला. खरतर बाळासाहेब हे कुणा एकाचे नाही आहेत. ते महापुरुष आहेत. प्रत्येकाला त्यांच्याबद्दल आदर आहे. त्यामुळे कोणीही त्यांचे दर्शन घेऊ शकतो. पण ज्यानी स्मृतीस्थळ पवित्र करण्याचा प्रयत्न केला त्यांनी आधी आधी मातोश्री पवित्र करावी. कारण मातोश्री राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पदस्पर्शाने अपवित्र झालेली आहे”, असा घणाघात बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी केला.
शिवसेना संस्थापक बाळासाहेबांच्या दहाव्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला एकनाथ शिंदे स्मारकावर पोहोचले होते. प्रतिस्पर्धी ठाकरे गटाशी संघर्ष होऊ नये म्हणून ते एक दिवस आधीच येथे दाखल झाले होते. शिंदे यांच्या भेटीनंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी स्मारकावर जाऊन गोमूत्र आणि पाण्याने स्मारकाची साफसफाई केली. यावेळी खासदार अरविंद सावंतही त्यांच्यासोबत होते. गोमूत्राने केवळ स्मारकच धुतले नाही तर बाळासाहेबांच्या स्मारकाला अर्पण केलेल्या हार आणि फुलेही बदलण्यात आली.
याचा निषेध करत शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर म्हणाले की, आम्ही या कृत्याचा तीव्र निषेध करतो. बाळासाहेब कोणत्याही एका व्यक्तीचे किंवा कोणत्याही एका पक्षाचे नाहीत. प्रत्येक पक्षाकडून त्यांची पूजा आणि आदर केला जातो.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut | “राजकीय स्वार्थासाठी इतर नेत्यांना भारतरत्न दिला, मग…”, संजय राऊतांचा फडणवीसांना खोचक सवाल
- Alia-Ranbir Baby | आलिया-रणबीरच्या मुलीचे नाव ऐकून, आजी नीतू कपूर झाली भावूक
- Raosaheb Danve | “लाज वाटली पाहीजे” ; बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण करणाऱ्यांवर दानवे संतापले
- IPL 2023 | बेन स्टोक्स आणि मयंक अग्रवाल यांच्यावर SRH लावेल मोठा दाव, आकाश चोपडाचा अंदाज
- Raosaheb Danve | गांधींसोबत जाणाऱ्यांकडून बाळासाहेबांच्या विचारांचा पराभव ; दानवेंची आदित्य ठाकरेंवर टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
