Share

ICC Ranks | टी 20 मध्ये पुन्हा भारतीय संघ आघाडीवर, विश्वचषक जिंकून इंग्लंड भारताच्या मागे

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: ऑस्ट्रेलियामध्ये नुकत्याच पार पडलेल्या टी 20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेमध्ये इंग्लंड (England) संघाने पाच गडी राखून पाकिस्तान (Pakisthan) संघाचा पराभव करत टी 20 विश्वचषक सामना आपल्या नावावर केला. तर दुसरीकडे आयसीसी (ICC) ने टी 20 क्रमवारी (Ranking) जाहीर केली आहे. यामध्ये विश्वचषक विजेतेपद जिंकणाऱ्या संघाला पिछाडीवर सोडत भारतीय संघ (Team India) पहिल्या स्थानावर आहे.

आयसीसी क्रमवारी (ICC Ranking) मध्ये भारतीय संघ पहिल्या स्थानावर

आयसीसी टी 20 च्या ताज्या क्रमवारीमध्ये टीम इंडिया 268 रेटिंगसह पहिल्या स्थानावर आहे. तर टी 20 विश्वचषक 2022 जिंकूनही इंग्लंड संघ 265 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर विश्वचषकाच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचणारा दुसरा संघ पाकिस्तान रेटिंगसह तिसऱ्या स्थानावर आहे. या यादीमध्ये भारतीय संघ इंग्लंड पेक्षा फक्त तीन गुणांनी पुढे आहे. दरम्यान, भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्ध होणारी तीन सामन्यांची टी 20 सिरीज जिंकून या यादीमध्ये आपले स्थिती मजबूत करू शकतो.

त्याचबरोबर आयसीसीने संघाची क्रमवारी जाहीर करत असताना फलंदाज, गोलंदाज आणि अष्टपैलू यांची देखील क्रमवारी जाहीर केली आहे. फलंदाजीमध्ये सूर्यकुमार यादव 859 रेटिंग गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. तर 836 रेटिंगसह मोहम्मद रिझवान दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीमध्ये सूर्यकुमार यादव शिवाय दुसरा कुठलाही भारतीय फलंदाज टॉप 10 मध्ये नाही. तर विराट कोहली या यादीवर अकराव्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर अष्टपैलू रांकिंगमध्ये हार्दिक पांड्या टॉप 10 मध्ये स्थान मिळवण्यास यशस्वी झाला आहे.

फलंदाजांच्या यादीमध्ये सूर्यकुमार यादव व्यतिरिक्त बाबर आझम, मोहम्मद रिजवान, एडन मारक्रम,डेव्हॉन कॉनवे हे टॉप 5 खेळाडू आहेत. तर अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये शाकिब अल हसन, मोहम्मद नबी आणि हार्दिक पांड्या हे टॉप तीन स्थानावर आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!