Share

मोठी बातमी : राहुल गांधी यांना कोरोनाची लागण

Published On: 

नवी दिल्ली : महाराष्ट्रासह देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेक उपाययोजना राज्यभरात राबवल्या जात आहेत. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे लसीकरण देखील सुरु आहे.

कोरोनाच्या विळख्यात अनेक नेते अडकत आहेत. कालच भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. आता कॉंग्रेसचे बडे नेते राहुल गांधी यांनी देखील कोरोनाची लागण झाली आहे. स्वतः ट्विट करून राहुल गांधी यांनी हि माहिती दिली आहे. कोरोना विषयक लक्षणं जाणवू लागल्यानंतर कोरोनाची चाचणी केली होती.  कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती राहुल गांधी यांनी दिली. अलीकडच्या काळात जे संपर्कात आले होते, त्यांनी कोरोनासंदर्भातील नियमांचं पालन करावं. कोरोना चाचणी करुन घ्यावी आणि सुरक्षित राहावं, असं आवाहन राहुल गांधी यांनी केलं आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच राहुल गांधी यांनी कोरोनाचा कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता पश्चिम बंगाल मधील सर्व प्रचार सभा रद्द केल्याची घोषणा केली होती तर अन्य राज्यकीय पक्षांना देखील राहुल गांधीनी असेच आवाहन केले होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!