जालना: एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, दुसरीकडे लोकांच्या बेफिकीरीमुळे कोरोनाचा उद्रेक कमी होण्याऐवजी वाढतच चालला आहे. गेल्या काही दिवसापासून पॉझिटिव्ह होण्याचे आणि मृत्यूचे प्रमाण वाढल्याने लोकांमध्ये प्रचंड धास्ती निर्माण झाली आहे. एक हजार चाचण्यांमागे पावने तीनशे चाचण्या पॉझिटिव्ह येत आहे. आज रविवारी लाळेच्या एकुण ३२४४ चाचण्या घेण्यात आल्या, त्यापैकी ९०९ लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्याचे प्रमाण २८.०२ टक्के एवढे आहे.
हे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढत चालल्याने भविष्यात आरोग्य सुविधा मिळण्यात मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या फेब्रुवारीपासून जालना जिल्ह्यात कोवीडची परिस्थिती गंभीरच बनली आहे. एकीकडे बाधितांचे प्रमाण वाढलेले आहे तर दुसरीकडे उपचार घेवून कोरोनावर मात केलेल्यांचे प्रमाणही गेल्या काही दिवसात वाढले आहे, परंतू मृत्यूचे प्रमाण मात्र कमी झाले नाही. दररोज सरासरी दहा ते बारा जणांचा मृत्यू होत आहे. लोकांमध्ये कोरोनाविषयी जागृती होवू लागली असली तरी सोशल डिस्टन्सच्या नियमांचे पालन होतांना दिसत नाही.
अनेकांनी तर लस आल्यानंतर कोरोनाची भितीच सोडून दिली आहे. तीन महिन्यापूर्वी सहा टक्क्यावर असलेला कोरोनाबाधितांचा दर आता २८.०२ टक्क्यावर गेला आहे. रूग्ण बरे होण्याचे प्रमाणही ९० टक्क्याच्या पुढे होते, परंतू आता म्हणजे १८ एप्रिलपर्यंत हे प्रमाण ७८.६६ टक्के एवढे झाले. मृत्यूदरही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जालना शहरासह जिल्ह्यात आता कोरोना आजाराविषयी लोक बिनधास्त झाले असून कोविशिल्ड लस आल्यानंतर लोकांमध्ये बेफिकीरी वाढली होती, परंतू आता विनामास्क फिरणाऱ्यांविरूध्द दंडात्मक कारवाया सुरू झाल्याने आता बहुतांश लोक मास्क घालीत आहे, परंतू जमावबंदी आदेश असतानाही सोशल डिस्टन्सच्याही ठिकऱ्या उडाल्या आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ५० लाखांचा विमा बंद, कोरोना योद्ध्यांना मिळणार नवे कवच
- ‘आम्हाला तुमच्या कामाचा वेग माहितीये’, सुप्रिम कोर्टाने केंद्राला फटकारले
- संसदेचे आपत्कालीन अधिवेशन बोलवा, काँग्रेसची राष्ट्रपतींकडे मागणी
- ‘बाअदब बामुलायजा होशियार ! उमर ४५ नहीं तो क्या हुआ आखिर वो फडण २० है
- होनी को अनहोनी करणाऱ्या धोनीची डाईव्ह ; ४०व्या वर्षी ही दाखवला फिटनेस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

