Share

‘टाइम पास ३’ च्या हक्कावरुन निर्माते आणि दिग्दर्शकात खडाजंगी

Published On: 

मुंबई : दिग्दर्शक रवी जाधव हे ‘टाइम पास’ चित्रपटांच्या यशानंतर तिसरा भाग घेऊन येत आहे. मात्र या चित्रपटाच्या निर्मितीत विघ्न येत आहे. कारण या चित्रपटाचे सहनिर्माते मौर्य फिल्म अँड एंटरटेन्मेटचे राजकुमार दहाने आणि दिग्दर्शक रवी जाधव या दोघात वितुष्ट आले आहे. हे दोघेही एकमेकावर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.

करारानुसार ‘टाइम पास’ या चित्रपटाचे सहनिर्मिते मौर्य फिल्म अँड एंटरटेन्मेन्टचे राजकुमार दहाने यांनी रवी जाधव यांना कायदेशीर नोटीस बजावली होती. या नोटीसला उत्तर देताना रवी जाधव यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हे सर्व आरोप निराधार आहेत असे रवी जाधव यांचे म्हणने आहे. रवी जाधव यांच्या वकिलाने दोन आठवड्यापुर्वी मौर्य फिल्म्सला कायदेशीर नोटीस पाठवली होती. यानंतर त्यांचा मौर्य फिल्म्ससोबत करार संपुष्टात आला होता. ‘टाइमपास ३’ चित्रपटाच्या अर्थसहाय्य करण्याच्या वचनबद्धतेचा त्यांनी भंग केला, असा आरोप रवी जाधव यांनी केला आहे.

निर्मात्याकडून पैसे न मिळाल्याने २ महिने प्रतिक्षा करुन आखेर स्वत:च्या पैशातुन चित्रपट निर्माण करावा लागला. मौर्य फिल्म्स आम्हाला आणि युनिटला त्रास देत आहेत. तसेच चित्रपटाच्या निर्मितीत हस्तक्षेप करीत आहेत. त्यामुळे रवी जाधव यांनी मौर्य फिल्म्स आणि आणि त्यांच्या प्रतिनिधीना फसवणुक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी कायदेशीर नोटीस पाठविली आहे. असे रवी जाधव हे म्हणाले. या सिनेमात हृता दुर्गुळे मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!