Share

राहुल द्रविड असणार टीम इंडियाचे नवे हेड कोच; BCCIची घोषणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड यांच्याकडे आता भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याबाबत बीसीसीआयने ट्वीट करून घोषणा केली आहे.

४८ वर्षीय राहुल द्रविड सध्या बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे काम पाहत असून यापूर्वीही त्यांनी श्रीलंकेच्या दौऱ्यावर प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. तसेच ते १९ वर्षांखालील संघ आणि भारत अ संघाला प्रशिक्षणही देत आहे. आता लवकरच ते टीम इंडियाचे मुख्य कोच म्हणून जबाबदारी पाहणार आहेत. या पदासाठी बीसीसीआयने अनिल कुंबळे, रिकी पाँटिंग, व्हीव्हीएस यांच्यासह काही इतर लोकांशी संपर्क साधला होता. सुरुवातीला कुंबळेचे नाव आधी पुढे आले, पण नंतर त्याचे नाव शर्यतीतून बाहेर पडले. अखेर राहुल द्रविड यांची निवड करण्यात आली आहे.

यानंतर राहुल द्रविड यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षकपदी वर्णी लागल्याचा अभिमान वाटत आहे. रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने चांगली कामगिरी केली आहे. हे कार्य पुढे घेऊन जाणार आहे. मी काही खेळाडूंसोबत इंडिया ए, अंडर-१९ आणि एनसीएमध्ये काम केलं आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्यास आनंद वाटेल. पुढच्या दोन वर्षात मोठ्या स्पर्धा आहेत. सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसोबत मिळून ध्येय गाठण्याचा प्रयत्न करू’ अशी प्रतिक्रिया राहुल द्रविड यांनी दिली आहे. दरम्यान आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपासून त्याच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ सुरू होईल, असे बीसीसीआयने म्हटले आहे. सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ ट्वेन्टी-२० विश्वचषकानंतर संपुष्टात येईल.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!