Share

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी नव्हे तर ‘या’ पदासाठी केला राहुल द्रविडने अर्ज

Published On: 

मुंबई : भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. हा दौरा संपुष्टात आल्यावर भारतीय संघ युएई येथे आयपीएल स्पर्धा खेळण्यासाठी रवाना होणार आहे. आयपीएल स्पर्धा संपुष्टात आल्यानंतर युएईतच टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ सहभाग नोदंवेल.

टी-२० विश्वचषक स्पर्धेसोबतच भारतीय संघाचे सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री त्याच्या पदाचा राजिनामा देणार आहे. त्यांच्या जागी राहुल द्रविड यांची निवड करण्यात यावी अशी अपेक्षा क्रिकेट रसीक करत आहे. यादरम्यान राहुल द्रविड यांनी बीसीसीआयकडे एक अर्ज केला आहे. मात्र हा अर्ज टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी नसुन नॅशनल क्रिकेट अकादमीच्या संचालकपदासाठी केला आहे. यामुळे ते भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होणार नाही यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे.

राहुल द्रविड सध्या याच पदावर कार्यरत आहे. याच पदावर काम करातना त्यांनी संस्थेचा चेहरमोहरा बदलण्यात मोठ योगदान दिलं आहे. त्यामुळे याच पदावर कायम राहण्याची इच्छा द्रविडने व्यक्त केली आहे. तसेच द्रविड शिवाय इतर कुणीही दिग्गज खेळाडूंनी या पदासाठी अर्ज न केल्याने द्रविडचे नाव अंतिम ठरवले जाण्याची शक्यता आहे. जर असे झाले तर द्रविडचा कार्यकाळ दोन वर्षांनी पुन्हा वाढणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!