मुंबई : नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत गोल्ड मेडल पटकावलं. भालाफेक स्पर्धेच्या फायनलमध्ये नीरज चोप्राने ही गोल्डन कामगिरी केली. टोकयो ऑलिम्पिकमधलं हे भारताचं पहिलंच गोल्ड मेडल आहे. तसंच ऑलिम्पिक इतिहासातलं एथलिटिक्समधलं हे भारताचं पहिलंच गोल्ड मेडल ठरले आहे. त्याच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर देशभरातील लोक त्याचं कौतुक करत आहेत. दरम्यान चित्रपट निर्माते मधुर भंडारकर यांनी नीरज चोप्रा मीराबाई चानू यांची भेट घेतली असता यांच्या आयुष्यावर लवकरच बायोपिक येणार असल्याची सोशल मिडीयावर जोरदार चर्चा रंगू लागल्या.
https://www.instagram.com/p/CSlq4Pvg8Su/?utm_source=ig_web_copy_link
याबाबत मधुर भंडारकर यांनी सांगितले की, स्वातंत्र्यदिना निमित्त मी दिल्लीमध्ये असल्याने मी टोकियो ऑलिम्पिकमधील स्पर्धकांना त्यांनी केलेल्या कामगिरीसाठी शुभेच्छा देण्यासाठी भेटलो. त्यावेळी मी नीरजला मजेशीर अंदाजात पुढे मी म्हणालो की नीरज तू गूड लूकींग आहे. त्यामुळे चित्रपटाच काम करण्याचा विचार आहे का?’ यावर नीरजने उत्तर देत सांगितेल की, ‘मला अभिनय करण्याची इच्छा नाही. मला माझ्या खेळावर लक्ष केंद्रीत करायचे आहे,’ असे मधुर भंडारकर नीरजसोबत झालेल्या संवादाबाबत सांगितले.
पुरुष भालाफेक स्पर्धेत ८३.५० मीटरपर्यंत भाला फेकणाऱ्या किंवा यापेक्षा कमी कामगिरी करणाऱ्या सर्वोत्तम १२ खेळाडूंना अंतिम फेरीत प्रवेश दिला जातो. बुधवारी पार पडलेल्या अ गटाच्या पात्रता फेरीत नीरजने ८६.६५ मीटरपर्यंत भाला फेकत थेट अंतिम फेरीत धडक मारली. नीरजने ८३.५० पेक्षा अधिक लांब भाला फेकत अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं होते. दरम्यान त्याने सर्वोत्तम थ्रो 87.58 मीटरचा केला. आणि भारताला तब्बल १३ वर्षान नंतर सुर्वण पदक मिळाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘कोर्टाने ठाकरे सरकारची पळवाट बंद केली, सीबीआय लवकरच मंत्रालयाची पायरी चढणार’; भाजपचा टोला
- धक्कादायक! नांदेडमध्ये मराठा आरक्षणासाठी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न
- ‘आम्ही कोणालाही शिंगावर घ्यायला तयार, मग ते राज ठाकरे असो वा कोणीही’
- धक्कादायक : भारतात कोविशील्डच्या बनावट लसी; जागतिक आरोग्य संघटनेने दिला इशारा
- भाजपला ‘जन आशीर्वाद’ महागात पडला; कल्याण डोंबिवलीत 4 गुन्हे दाखल


