🕒 1 min read
पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या ९९ व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला पुण्यात हजेरी लावली होती. याचदरम्यान त्यांनी जाती व्यवस्थेवरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसवर निशाणा साधला होता. त्यानंतर संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांनी राज ठाकरे यांना पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही, ते पुरंदरेंच्या ब्राह्मणी वर्चस्वाच्या विचारणसरणीला जवळ करत आहेत. असा आरोप करत राज ठाकरेंवर तोफ डागली होती.
आता हा वाद अजूनच चिघळण्याचे चिन्ह दिसत आहेत. मनसेकडून संभाजी ब्रिगेड आणि प्रवीण गायकवाड यांना चोख प्रत्युत्तर दिले जात असतानाच त्यात श्रीमंत कोकाटे यांनी देखील उडी घेतली. आता या सर्वांमध्ये टीका-टिपण्णी केली जात असताना प्रवीण गायकवाड समर्थकांनी ‘आम्ही कोणालाही शिंगावर घ्यायला तयार, मग ते राज ठाकरे असो वा कोणीही,’ असं विधान केलं आहे. त्यामुळे मनसे अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
‘राज ठाकरे हे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचा खोटा इतिहास वाचवण्याचं काम करत आहेत. पुणे ही कोणाच्या बापाची जहाँगिरदारी नाही. आम्ही कोणालाही शिंगावर घ्यायला तयार आहोत. मग ते राज ठाकरे असो किंवा कोणीही. इतिहासावरील चर्चेला चर्चेनं, गुद्द्याला गुद्द्यानं उत्तर देऊ.’ असा इशारा प्रवीण गायकवाड यांच्या समर्थकांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘तुम्ही कितीही ताकद लावा शेतकरी येणार अन् बैलगाडा शर्यत होणारच’
- भारतातील मुस्लिम लॉ बोर्डाकडून तालिबानचे कौतुक
- ‘मंदिरे खुली करण्यासाठी आंदोलने करण्यापेक्षा दिल्लीतून लस आणण्यासाठी भाजपने प्रयत्न करावेत’
- शाळा बंदवरून रघुराम राजन यांचा सरकारला गंभीर इशारा, म्हणाले..
- ‘ मातोश्रीने करून दाखवलं ! काम केलं म्हणून उद्धव ठाकरे टॉप 5 मध्ये आले’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
