नवी दिल्ली : कोल्हापूर जिल्ह्याला ऐतिहासिक, पैलवानांचा आणि खाद्य संस्कृतीचा वारसा लाभला आहे. तांबड्या मातीतून देशभरात कोल्हापूरचा डंका गाजवणाऱ्या मल्लांची जडणघडण या जिल्ह्यात झालेली आपण पाहिलं आहे. रांगडं पण रुजलेल्या या मातीत गेल्या काही वर्षात फुटबॉल, हॉकी, नेमबाजी, क्रिकेट यांच्यासह इतर क्रीडाप्रकारांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढतोय.
आता कोल्हापूरवासीयांसह संबंध देशासाठी अभिमानास्पद कामगिरी कोल्हापूरच्या राही सरनोबत हीने केली आहे. क्रोएशियाच्या ओसीजेकमध्ये सुरू असलेल्या नेमबाजी विश्वचषक २०२१ स्पर्धेत भारताच्या नेमबाज राही सरनोबत हिनं सुवर्णपदकाची कमाई केली आहे. २५ मीटर एअर पिस्तल प्रकारात राहीनं ३९ गुणांसह अव्वल स्थान प्राप्त करत सुवर्णपदक जिंकलं. तर फ्रान्सच्या माथिल्डे लामोले हिनं ३१ गुणांसह रौप्य पदकाची कमाई केली. तर रशियाची विन्टालिना २८ गुणांसह कांस्य पदकाची मानकरी ठरली आहे.
सुरुवातीपासूनच आघाडी घेत राहीनं अचूक लक्ष्यवेध घेत सुवर्णपदकाची कामे केली आहे. या वर्ल्डकपमध्ये १० मीटर एअर पिस्तूल मिश्र स्पर्धेत सौरभ चौधरी आणि मनु भाकेर या भारतीय जोडीने रौप्यपदक जिंकले. तर, सरनोबतने मिळविलेले सुवर्णपदक हे वर्ल्डकपमधील भारताचे पहिले सुवर्णपदक आहे. राहीच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला मुदतवाढ द्या’, राज्य सरकारची सुप्रीम कोर्टात याचिका
- ‘वडेट्टीवारांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन समाजावरचे प्रेम दाखवावे’, निलेश राणेंचे आव्हान
- ‘स्वतंत्र विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नव्हते ना, त्याचे काय झाले?’, थोरातांचा फडणवीसांना सवाल
- ‘लढवय्ये नेते फडणवीसांची गरज आहे, संन्यास घेऊ देणार नाही’, संजय राऊतांनी केले कौतूक
- ‘इशाऱ्यावर चालणाऱ्याला वाघ नव्हे तर पालतू कुत्रा म्हणतात’, नितेश राणेंनी शिवसेनेला डिवचले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
