🕒 1 min read
मुंबई : राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लोणावळा येथील ओबीसी चिंतन बैठकीत शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला लगावला. मंचावरील भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक वाघ नाना पटोले यांच्याकडे पाठवा असे सांगितले. त्यावर वाघ आमच्या इशाऱ्यावर चालतो, असे म्हणत त्यांनी शिवसेनेला अप्रत्यक्षपणे खोचक टोला लगावला होता.
यावरून महाविकास आघाडीतील वर्चस्ववादाचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. दरम्यान, वाघाच्या इशाऱ्यावर शिवसेनेने अद्याप प्रतिक्रिया दिली नाहीये. मात्र, भाजपने या मुद्द्यावरून शिवसेनेवर निशाणा साधणे सुरू केले आहे. भाजप नेते नितेश राणे यांनी वडेट्टीवारांच्या बोलण्याचा संदर्भ घेत, शिवसेनेला डिवचले आहे. सर्कशीतील वाघच इशाऱ्यावर चालतो अशी टिका त्यांनी केलीय.
मंत्री महोदय म्हणतात, आमच्या इशाऱ्यावर वाघ चालतो..
इशाऱ्यावर चालणारा वाघ एकतर सर्कस मध्ये असतो..
नाहीतर तो वाघच नसतो..
त्याला पालतू कुत्रा म्हणतात!!बाकी समझदारोंको इशारा काफी है!!!
— Nitesh Rane (@NiteshNRane) June 28, 2021
ट्विटमध्ये नितेश राणे म्हणालेत की, ‘मंत्री महोदय म्हणतात, आमच्या इशाऱ्यावर वाघ चालतो. इशाऱ्यावर चालणारा वाघ एकतर सर्कसमध्ये असतो. नाहीतर तो वाघच नसतो. त्याला पालतू कुत्रा म्हणतात. बाकी समझदारोंको इशारा काफी है!!!’ असे म्हणत त्यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.
काय म्हणाले होते वडेट्टीवार?
ओबीसी चिंतन बैठकीत विजय वडेट्टीवार यांनी मी अशा भागातील राहतो जेथे भरपूर वाघ आहेत. त्यामुळे मी माझ्या खात्यात पैसे आले तर परत जाऊ देणार नाही, असे म्हटले. यावर मंचावर बसलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक वाघ नाना पटोले यांच्याकडेही पाठवा असे सांगितले. त्यावर विजय वडेट्टीवार यांनी आम्ही वाघ पाठवू, पण तो वाघ आमच्याच इशाऱ्याने चालतो. कारण तो आमचा वाघ आहे, असे म्हणत अप्रत्यक्षरित्या शिवसेनेला टोला लगावला.
महत्वाच्या बातम्या
- महसूल मंत्री थोरात वडेट्टीवारांना म्हणाले, ‘मोठी संधी मिळेल, वाट पाहा!’
- देशात पहिल्यांदा ड्रोनने अतिरेकी हल्ला, जम्मू एअरबेसवर दोन बॉम्बस्फोट
- ‘विजय वडेट्टीवार यांना दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाचं खातं द्यायला हवं होतं, मात्र…’
- पुण्यात उद्यापासून नियम आणखी कडक; जाणून घ्या आज किती रुग्ण संख्या
- औरंगाबादकरांसाठी आनंदाची बातमी; कोरोना रुग्ण संख्येत कमालीची घट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
