मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या लढ्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने नागपूर येथे दोन दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस यांनी आंदोलन केले होते. यावेळी त्यांनी ‘राज्य सरकारला आरक्षण देणे जमत नसेल तर त्यांनी सूत्रे आमच्याकडे सोपवावी. चार महिन्यांत आरक्षण परत मिळवून नाही दिले, तर राजकीय संन्यास घेईन, अशी घोषणा केली होती.
त्यांच्या या वक्तव्याची राज्यभरात चांगलीच चर्चा झाली होती. फडणवीस यांचा रुद्रावतार पाहून ठाकरे सरकारमधील अनेक नेत्यांनी प्रतिक्रियाही दिली नाही. पण यावर आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून, देवेंद्र फडणवीसांचे भविष्य उज्ज्वल आहे. त्यांना संन्यास घेण्याची भाषा शोभत नाही, असे म्हटले आहे
राऊत म्हणाले, ‘देवेंद्र फडणवीस लढवय्ये नेते आहेत. त्यांना संन्यास घेऊ देणार नाही. त्यांची महाराष्ट्र, देशाला गरज आहे. अशी भाषा त्यांना शोभत नाही. चांगल्या नेतृत्त्वाचा राजकारणात तुटवडा आहे. फडणवीसांसारख्या हरहुन्नरी नेत्यांने फकीर होण्याची भाषा करणे योग्य नाही. संन्यास वगैरे घेण्याची भाषा करू नका, त्यासाठी मी त्यांना स्वत: भेटून सांगेन’, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’च्या आजच्या अग्रलेखातूनही फडणवीसांच्या या संन्यास घेण्याच्या घोषणेवर भाष्य करण्यात आलंय. ‘फडणवीसांनी असा त्रागा करणं योग्य नाही. संन्यास घेतील त्यांचे शत्रू,’ असे अग्रलेखात म्हटलेय.
महत्वाच्या बातम्या
- ‘इशाऱ्यावर चालणाऱ्याला वाघ नव्हे तर पालतू कुत्रा म्हणतात’, नितेश राणेंनी शिवसेनेला डिवचले
- महसूल मंत्री थोरात वडेट्टीवारांना म्हणाले, ‘मोठी संधी मिळेल, वाट पाहा!’
- देशात पहिल्यांदा ड्रोनने अतिरेकी हल्ला, जम्मू एअरबेसवर दोन बॉम्बस्फोट
- ‘विजय वडेट्टीवार यांना दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाचं खातं द्यायला हवं होतं, मात्र…’
- पुण्यात उद्यापासून नियम आणखी कडक; जाणून घ्या आज किती रुग्ण संख्या


