Share

‘वडेट्टीवारांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन समाजावरचे प्रेम दाखवावे’, निलेश राणेंचे आव्हान

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ओबीसी असल्यामुळे महसूल खाते मिळाले नाही, अशी खंत मदत व पुनर्वसन मंत्री आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पुण्यात बोलून दाखवली. वडेट्टीवार यांच्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील खदखद पुन्हा एकदा बाहेर आल्याचं चित्र आहे. यावरून वडेट्टीवार यांच्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी टीका केली आहे. ‘वडेट्टीवारांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन ओबीसी समाजावरचे प्रेम दाखवावे’ असे आव्हान त्यांनी दिलेय.

निलेश राणे यांनी ट्विट केले की, ‘महसूल खातं मिळालं नाही ही खंत असेल वडेट्टीवारांची तर महाविकास आघाडी ओबीसी समाजाच्या विरोधात आहे असा अर्थ होतो. पण तरीसुद्धा तुम्ही मंत्री म्हणून त्या मंत्रिमंडळात का चिटकले आहात? राजीनामा देऊन तुम्ही खरचं समाजावर प्रेम करता हे दाखवून द्या’.

काय म्हणाले होते वडेट्टीवार?

ओबीसी म्हणून आपल्यावर अन्याय झाल्याची खंत अनेकांची आहे. मात्र, या अन्यायाला जाहीर वाचाही फोडता येत नाही. कारण, तसे झाल्यास या ओबीसी नेत्यांचे पंख पक्षात कापले जातात, असेही दुखणे आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांची खंत तर जगजाहीर आहे. ‘ओबीसी नसतो, तर याहून अधिक तालेवार खाते मिळाले असते. कदाचीत ओबीसी असल्यामुळे मदत व पुनर्वसन खाते मिळाले, असे विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.

थोरात यांनी दिला सबुरीचा सल्ला

दरम्यान, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी वडेट्टीवार यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. ‘काँग्रेस पक्षाने वसंतराव नाईक यांना मुख्यमंत्री बनवलं. बॅरिस्टर अंतुले यांना काँग्रेसने संधी दिली. वडेट्टीवार यांचं वय पाहिलं तर मोठी संधी पुढच्या काळात मिळेल.काँग्रेस बिलकुल जातीयवादी किंवा धर्मवादी पक्ष नाही. सगळ्यांना एकत्र घेऊन जाणारा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. वडेट्टीवार यांना वेगळं काहीतरी म्हणायचं असेल, आपल्या सगळ्यांचा गैरसमज झाला असेल. वडेट्टीवारांचं वय पाहिलं तर खूप मोठी संधी पुढच्या काळात मिळणार आहे. त्याकरता त्यांना थोडीशी वाट पाहावी लागेल’ असे थोरात म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!