🕒 1 min read
मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. ओबीसी आरक्षण पुन्हा लागू करण्यात यावं, यासाठी शनिवारी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेत, सत्तेवर आल्यास चार महिन्यात आरक्षण देऊ शकलो नाही तर राजकारणातून संन्यास घेईल, अशी भूमिका घेतली होती.
यावर काँग्रेस नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. माध्यमांनी थोरात यांनी फडणवीसांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली असता थोरात म्हणाले की, ‘देवेंद्र फडणवीस याचं विधान तुम्ही फार गांभीर्यानं घेतले. या आधीही त्यांनी स्वतंत्र विदर्भ होत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही असे म्हटलं होते’.
‘देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत तुमच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवू असे, धनगर समाजाला सांगितले होते. पण पहिल्या बैठकीतही नाही व पाच वर्षातही धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही. ते फक्त दिशाभूल करत गेले. सत्तेसाठी वारेमाप बोलायचे आणि वाट्टेल ते आश्वासन द्यायचे. नंतर मात्र ते कृतीतून करायचे नाही, असा अनुभव भाजपचा आपल्याला आधीपासूनच आहेच. जनमाणसाला फसवणे आणि सत्ता मिळवणे हा उद्देश ठेवून ते अशी वक्तव्य करतात,’ अशी टीका थोरात यांनी केली.
फडणवीसांना संन्यास घेऊ देणार नाही-राऊत
शिवसेना नेते संजय राऊत यांनीही या विषयावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, ‘देवेंद्र फडणवीस लढवय्ये नेते आहेत. त्यांना संन्यास घेऊ देणार नाही. त्यांची महाराष्ट्र, देशाला गरज आहे. अशी भाषा त्यांना शोभत नाही. चांगल्या नेतृत्त्वाचा राजकारणात तुटवडा आहे. फडणवीसांसारख्या हरहुन्नरी नेत्यांने फकीर होण्याची भाषा करणे योग्य नाही. संन्यास वगैरे घेण्याची भाषा करू नका, त्यासाठी मी त्यांना स्वत: भेटून सांगेन’, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘लढवय्ये नेते फडणवीसांची गरज आहे, संन्यास घेऊ देणार नाही’, संजय राऊतांनी केले कौतूक
- ‘इशाऱ्यावर चालणाऱ्याला वाघ नव्हे तर पालतू कुत्रा म्हणतात’, नितेश राणेंनी शिवसेनेला डिवचले
- महसूल मंत्री थोरात वडेट्टीवारांना म्हणाले, ‘मोठी संधी मिळेल, वाट पाहा!’
- देशात पहिल्यांदा ड्रोनने अतिरेकी हल्ला, जम्मू एअरबेसवर दोन बॉम्बस्फोट
- ‘विजय वडेट्टीवार यांना दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाचं खातं द्यायला हवं होतं, मात्र…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
