जळगाव : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा सुरु आहे. या यात्रेची खिल्ली उडवत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील राहुल गांधींवर घणाघाती टीका केली आहे. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा ऐवजी त्यांचा सुरु असलेला काँग्रेस छोडो कार्यक्रमावर काम केलं पाहिजे, असं विखे पाटलांनी म्हटलं आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांचा काँग्रेस नेत राहुल गांधी यांना टोलाः
राधाकृष्ण विखे पाटील आज जळगाव दौऱ्यावर आहेत. यावेळी सत्ता गेल्याचं वैफल्य काही लोकांना झालंय, त्यामुळे ते वैफल्यातून राज्य सरकारवर टीका करत आहेत, त्यांच्याकडे आपण फार लक्ष द्यायची गरज नाही, असं म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.
राज्य सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे काम करत असून चांगले निर्णय घेतले जात आहेत, सरकार म्हणून आम्ही जनतेची जबाबदारी घेत आहोत, मागच्या सरकारसारखं आम्ही माझं कुटुंब तुमची जबाबदारी सारखं वागणार नाही, असं म्हणत त्यांनी एकाचवेळी शिंदे-फडणवीस सरकारचं कौतुक केलं तर ठाकरेंवर टीका देखील केली आहे.
आजपासून भारत जोडो यात्रेला सुरुवातः
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आजपासून भारत जोडो यात्रेला सुरुवात केली आहे. कन्याकुमारी ते काश्मीर असा हा 150 दिवसांचा प्रवास असणार आहे. 12 राज्यांतून ही यात्रा जाणार असून एकूण 3570 किलोमीटरचा हा प्रवास असणार आहे.
महत्वाच्या बातम्याः
- Ashish Shelar | एकनाथ शिंदे यांना दाबण्याचे काम पेंग्विन सेनेने केलं – आशिष शेलार
- Subhash Wankhede | “नवनीत राणा या मोदी आणि भाजपच्या अंधभक्त”
- NCP । पवार कुटुंबाचं विसर्जन करणारा जन्माला यायचाय, काळू बाळूंनी बारामतीत जाऊन…; राष्ट्रवादीचा हल्लाबोल
- Aditya Thackeray | याकूब मेमन प्रकरणावर आदित्य ठाकरेंचा भाजपवर पलटवार, म्हणाले…
- Atul Londhe | “‘ती’ चूक भाजपने मुद्दामहून केली, कारण त्यांना धार्मिक शांतता नांदू द्यायची नाहीय”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

