🕒 1 min read
औरंगाबाद : मराठा आरक्षणानिमित्त शिव संग्राम पक्षातर्फे घेण्यात येणाऱ्या एल्गार मेळाव्याच्या आढावा बैठकीत, पडेगाव येथे शिवसैनिकांनी विनायक मेटे यांचे भाषण थांबवत. आयोजकांना मारहाण करत सोन्याची चैन चोरल्याचा आरोप बैठकीचे आयोजक अभिमन्यू उमाकांत माणके यांनी केला आहे. या प्रकरणी शिवसैनिकांच्या विरोधात छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, शिव संग्राम पक्षातर्फे दि. २६ रोजी श्रीहरी पव्हेलीयन येथे मराठा आरक्षणासंदर्भात एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी पक्षाचे अध्यक्ष आ. विनायक मेटे यांच्या उपस्थितीत पडेगाव येथील ईश्वर हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे भाषण करत असतांना, गुरुवारी दुपारी एकच्या दरम्यान राहुल यलदि, सचिन घनवट हे त्याचवेळी बैठकीतून बाहेर पडले.
त्यानंतर त्यांनी शिवसेनेचे अंबादास म्हस्के, किसन घनवट, नवनाथ मुळे यांच्यासह बैठक सुरु असलेल्या ठिकाणी प्रवेश केला, त्यानंतर विनायक मेटे यांचे भाषण बंद पाडत आयोजकांना धक्काबुक्की सुरु केली. यात डॉ. अभिमन्यू माणके यांची एक लाख किंमतीची तीन तोळ्याची सोन्याची चैन चोरीला गेली. हा प्रकार घडत असताना अनेकांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु शिवसैनिकांनी राडा घालत तेथून काढता पाय केला. त्यानंतर माणके यांनी छावणी पोलीस ठाणे गाठत शिवसैनिकांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
महत्त्वाच्या बातम्या
- #HBD : मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री ‘सई ताम्हणकरला’ वाढदिवसाच्या शुभेच्छा…
- कर्णधार कोहलीचा ‘बेस्ट ऑफ थ्री’ला पाठिंबा, म्हणाला…
- मराठवाड्याला अतिरीक्त पाणी देण्याचे सरकारचे नियोजन- जयंत पाटील
- खासगी कोचिंग क्सासेससाठी आमदार अंबादास दानवे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे शिष्टाई
- ‘मोठी गोष्ट सहज मिळत नाही’ ; पराभवानंतर शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
