🕒 1 min read
नांदेड : कोरोनाची पार्श्वभूमी असतानाही यावर्षी तंत्रशिक्षण संचालनालयांतर्गत पदविका प्रवेश वाढविण्यात गतवर्षीपेक्षा यावर्षी मोठ्या प्रमाणावर यश मिळाले आहे. नुसते प्रवेश वाढविणे पुरेसे नाही तर विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. उत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढवून तज्ज्ञ आणि कुशल अभियंता म्हणून त्याला आपले योगदान चांगल्या पद्धतीने देण्यासाठी तंत्रशिक्षणाचा पाया मजबूत करण्याची जबाबदारी पदविका संस्थांची आहे. यासाठी विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी केले. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 71व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणप्रसंगी शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथे ते बोलत होते.
कालानुरूप आवश्यक बदल सर्वांनी अंगीकारणे गरजेचे असून कोरोना काळात निर्माण झालेली आव्हाने पेलण्यासाठी नवनवीन अध्यापन कौशल्ये व आनुषंगिक तंत्रज्ञान आत्मसात करण्याची निकड त्यांनी विशद केली. वर्क फ्रॉम होममुळे कामाची गुणवत्ता वाढल्याचा दाखला त्यांनी याप्रसंगी दिला. पदविका शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीसाठी गुणवंत विद्यार्थी निवडण्यासाठी कंपन्या परिसर मुलाखती घेतात. विविध कारणास्तव नामांकित कंपन्या मोठ्या शहरातील महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनाच प्राधान्य देतात. असे डॉ. अभय वाघ म्हणाले आहेत.
आपला ग्रामीण भागातील विद्यार्थी चांगल्या गुणाने उत्तीर्ण होऊन आणि क्षमता असूनही संधी न मिळाल्याने अशा कंपन्यांच्या मुलाखतीपासून वंचित राहतो, याअडचणीचे निराकरण करण्यासाठी FLIP TPO ही नवी संकल्पना पुढील काळात पदविका अभियांत्रिकी स्तरावर राबविण्यात येणार असल्याची माहिती डॉ. अभय वाघ यांनी यावेळी दिली.
महत्वाच्या बातम्या
- भाजप अडचणीत, गैरव्यवहार प्रकरणी बाजार समितीच्या तत्कालीन संचालकांची चौकशी
- राज ठाकरे हाजीर होSSS वाशी न्यायालयाचे राज ठाकरेंना आदेश !
- राष्ट्रवादीला खिंडार पाडत अखेर धवलसिंह मोहिते पाटलांनी धरला काँग्रेसचा हात
- बहुतांश शेतकऱ्यांना कृषी कायद्यांची माहिती नाही, अन्यथा देश पेटून उठेल; राहुल गांधींचा दावा
- DDLJ आणि मराठा मंदिर हे समीकरण आजही ठरतंय Houseful!


