🕒 1 min read
पुणे : भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई या महिलांच्या प्रश्नांविषयी नेहमी आक्रमक असतात. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी धार्मिक ठिकाणी महिलांच्या प्रवेशाविषयी आक्रमक भुमिका घेतल्याचे दिसत आहे. मात्र, आता त्यांनी मंदिरात महिलांना प्रवेश तर हवाच. शिवाय मंदिरात महिला पुजारी पाहिजेत अशी मागणी केली आहे.
साडेतीन पीठांपैकी एक पीठ असलेले श्रीक्षेत्र माहूर येथील रेणुकादेवी मंदिरात एकही महिला पुजारी नाही. शक्तिपीठ देवीचे असूनही देवीला अभिषेक, साडी, मंगळसूत्र घालण्याचे काम पुरुष पुजारी करतात. या ठिकाणी ५० टक्के महिला पुजारी हवेत, अशी मागणी मंदिर विश्वस्तांकडे करण्यात आली आहे.
या ठिकाणी महिला पुजारी घेऊन राज्यात आदर्श निर्माण करावा, मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी दिला.महिलांना मासिक पाळी येत असल्याने त्यांना पुजारी म्हणून घेतले जात नाही, असे कारण सांगितले जाते. परंतु, स्त्री-पुरुष समानता असली पाहिजे. ही आंदोलनाची भूमिका असून माहूर येथील महिला नगरसेविकांसोबत यासंबंधी चर्चा करण्यात आली. मंदिराच्या विश्वस्तांमध्येही महिलांचा समावेश झाला पाहिजे, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.
दरम्यान, देसाई यांनी घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात गुरुवारी ब्राह्मण महासंघाच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले. तृप्ती देसाई सातत्याने हिंदू धर्माच्या परंपराबाबत विरोधी भूमिका घेत असतात. फक्त पब्लिसिटी स्टंट त्या करत असतात. मात्र यापुढे हे खपवून घेणार नाही, असे ब्राह्मण महासंघाच्या महिला कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.यावेळी जिल्हाध्यक्षा मधुरा बर्वे, शहराध्यक्षा नीता जोशी,युवती आघाडी प्रमुख क्रांती गोखले आणि प्रदेश पदाधिकारी तृप्ती तारे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- “बेन स्टोक्सला मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात घ्या”
- ट्रॅक्टर रॅलीवरून महाभारत सुरु असताना आता भाजपाने केली ‘तिरंगा रॅली’ची घोषणा
- तेरा वर्षीय मुलीसोबत लग्न, नवरदेवाविरोधात पॉक्सोचा गुन्हा
- ‘या’ दोन मोठ्या शेतकरी संघटनांनी घेतली आंदोलनातून माघार
- पक्षविरोधी भूमिकेचे आ. सावंत यांच्याकडून खंडण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

