🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावरुन आता राजकारण पेटायला सुरुवात झाली आहे. ‘महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद संघर्ष आणि संकल्प’ या शासकीय पुस्तकाचं काल राज्यातील दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आलं. गेली अनेक दशके महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सुटलेला नाही. कर्नाटकच्या सीमाभागात अनेक मराठी भाषिकांना गळचेपी सहन करावी लागत आहे. त्यांच्यावर अनेक प्रकारे अन्याय केला जातो. या मराठी भाषिकांना महाराष्ट्रात सहभागी व्हायचं आहे. मात्र, त्यांचा हा अनेक दशकांचा संघर्ष अजूनही सुरूच आहे. यावरच हे पुस्तक आधारित आहे.
या पुस्तक प्रकाशना दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बेळगावसह विवादित भाग हा केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करावा जेणे करून स्थानिक मराठी भाषिकांवर अन्याय होणार नाही अशी भूमिका स्पष्ट केली होती. त्यानंतर, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बेळगाव सोडा मुंबईही आमचाच भाग आहे, अशी मुक्ताफळं उधळली आहे.
मुंबईवर आमचा हक्क आहे, अशी दर्पोक्ती कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे. इतकच नाही तर मुंबई प्रदेश केंद्रशासित करा अशी मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याचं वक्तव्यही सवदी यांनी केलंय. सवदी यांच्या या वक्तव्यामुळं सीमाभागात संतापाची लाट पसरली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी लक्ष्मण सवदी यांची ही मागणी राज्यातील भाजप नेत्यांना मान्य आहे का, असा सवाल केला आहे. ‘कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी मुंबईला केंद्रशासित प्रदेश करावं, असं वक्तव्य केलं आहे. राज्यातील भाजपचे नेते, महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्मण सवदी यांची मागणी मान्य आहे का? भारतीय जनता पक्षाने याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी. ते जर महाराष्ट्रासोबत असतील तर त्यांनी लक्ष्मण सवदी यांना चोख उत्तर देणं अपेक्षित आहे,’ अशी प्रतिक्रिया तपासे यांनी दिली आहे.
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी मुंबई शहराला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्याची मागणी केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष @ChDadaPatil व विरोधी पक्षनेते @Dev_Fadnavis यांना ही मागणी मान्य आहे का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते @maheshtapase यांनी केला आहे. pic.twitter.com/h5xCsVvnUn
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) January 28, 2021
महत्वाच्या बातम्या
- भाजप अडचणीत, गैरव्यवहार प्रकरणी बाजार समितीच्या तत्कालीन संचालकांची चौकशी
- राज ठाकरे हाजीर होSSS वाशी न्यायालयाचे राज ठाकरेंना आदेश !
- राष्ट्रवादीला खिंडार पाडत अखेर धवलसिंह मोहिते पाटलांनी धरला काँग्रेसचा हात
- बहुतांश शेतकऱ्यांना कृषी कायद्यांची माहिती नाही, अन्यथा देश पेटून उठेल; राहुल गांधींचा दावा
- DDLJ आणि मराठा मंदिर हे समीकरण आजही ठरतंय Houseful!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

