🕒 1 min read
लातूर : लातूर जिल्ह्यातील औसा येथे तेरा वर्षीय मुलीसोबत विवाह करणाऱ्या नवरदेवाविरोधात भादा पोलीस ठाण्यात अत्याचाराच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पीडित मुलीच्या चुलत्याने हा विवाह लावून दिल्याचे समोर आल्याने त्यांच्यावरही कारवाई केली गेली.
मिळालेल्या माहितीनुसार, औसा तालुक्यातील शिंदाळा येथील रामदास प्रकाश वेदपाठक उर्फ बाळू आणि पीडितेचा चुलता हे दोघे पीडित मुलीच्या वडिलाचा हात मोडल्याने त्यांना पाहण्यासाठी हैदराबादला गेले होते. तेथून आल्यावर आपल्या भावाच्या दोन्ही मुलींना मकरसंक्रांतीसाठी गावाकडे घेऊन जातो असे म्हणत पीडिता आणितिच्या बहिणीला आपल्या सोबत घेऊन येळनूर (ता. निलंगा) या गावी आले. सुरुवातीचे काही दिवस या मुली फोन करून आपल्या आई- वडिलांना बोलत होत्या. परंतु नंतर यातील तेरा वर्षांच्या मुलीचे फोनवर बोलणे बंद झाले. याच काळात पीडित मुलीच्या दुसऱ्या एक चुलत्याने फोन करून तुमच्या तेरा वर्षांच्या मुलीचा विवाह रामदास वेदपाठक या होमगार्डसोबत करून दिल्याचे पीडित मुलीच्या वडिलाला सांगितले. त्यानंतर पीडित मुलीच्या वडिलाने मुलीशी संपर्क साधून घटनेची माहिती विचारली असता घडलेला प्रकार तिने सांगितला.
सदरील अल्पवयीन मुलीचा विवाह 8 जानेवारी रोजी सास्तूर-माकणी या ठिकाणी लावून देण्यात आला होता. लग्नानंतर रामदास याने तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून भादा पोलिस ठाण्यात रामदास विरोधात पॉक्सो व बालविवाह प्रतिबंधात्मक कायद्यानुसार तर चुलत्या विरोधात बालविवाह प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
महत्वाच्या बातम्या
- माहूरमधील रेणुकादेवी मंदिरात महिला पुजाऱ्यांना स्थान द्या, तृप्ती देसाईंची मागणी
- अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या मशिदीत नमाज अदा करणे हे हराम आहे : ओवेसी
- ‘…तर असा बदनामीकारक मजकूर आपण कधीच ट्विटमध्ये वापरला नसता’
- महाजनांच्या भेटीनंतरही अण्णा हजारे उपोषणावर ठाम; भाजपचे धाबे दणाणले
- ‘या’ जागेसाठी विधानसभा निवडणुकीत झाली फिक्सिंग, भाजप नेत्याचा गौप्यस्फोट


