मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणेंना रत्नागिरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. कालपासून नारायण राणेंविरोधात राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. त्याच तक्रारींच्या अनुषंगाने नारायण राणेंवर कारवाई करत रत्नागिरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
राणेंना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांची दोन्ही मुले त्यांच्यासोबत होती. भाजपचे नेते निलेश राणेंनी पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं. त्याचबरोबर, कार्यकर्त्यांना गाडी अडवा नाही अडवली तर गाडीपुढे झोपा, असंही निलेश राणेंनी सांगितलं.
नारायण राणे हे त्यांच्या गाडीतूनच पोलिसांसोबत गेले. रत्नागिरी पोलिसांनी राणेंच्या ड्रायव्हरलाही गाडीतून उतरवलं होतं. नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात नारायण राणे यांनी आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र उच्च न्यायालयाने देखील राणे यांना दणका दिला आहे. हायकोर्टाने जामीन फेटाळला असून तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.
राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटत आहेत. शिवसेनेचे नाशिकमधील शहाराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी नारायण राणेंविरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आमच्या विरुद्ध, आमच्या पत्नीच्याविरुद्ध तुम्ही काय काय केलंत ? फडणविसांनी साधला सत्ताधाऱ्यांवर निशाणा
- “हिंदुत्वाशी गद्दारी करुन मुख्यमंत्रिपद मिळवलं”; नारायण राणे पुन्हा बरसले
- ‘नारायण राणे छक्का है, नारायण राणे भडवा है!’, संतप्त शिवसैनिकांची घोषणाबाजी
- ‘माझी बदनामी केली तर तुमच्याविरोधात गुन्हा दाखल करेन’, नारायण राणेंची वृत्तवाहिन्यांना धमकी
- ‘…अन्यथा पोलीस आयुक्तालयाबाहेर आंदोलन करायला बसू’ ; फडणवीसांचा इशारा


