मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह संपूर्ण राज्यातील वातावरण तणावपूर्ण झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात राणेंविरोधात शिवसैनिक चांगलीच आक्रमक झाली आहे. राणेंविरोधात राज्यातील शिवसेना तापलेली असताना नारायण राणे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. आपल्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान संगमेश्वर इथे आयोजित सभेत राणे बोलत होते.
‘त्यांनी, राज्यात यांची सत्ता आहे. आमदारकीचे ५६ आमदार आहेत. हिंदुत्वाशी गद्दारी करुन यांनी मुख्यमंत्रीपद मिळवले आहे. पण इथे १२ झेंडे दिसत आहेत. काय अवस्था झाली आहे यांची. मी जर आत्ता सांगितलं तर त्यांची पळता भुई थोडी होईल. हिंदुत्वाशी गद्दारी करुन उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपद मिळवलं, असं म्हणत राणेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. , असं राणे म्हणाले.
काही दिवसांनी हे सत्तेवर नसतील आणि ह्या समोरच्यांच्या हातात पण काही दिवसांनी हा झेंडा नसेल. त्यांचे मनपरिवर्तन होईल. म्हणून पोलिसांना सांगतोय, त्यांना म्हणावं घरी जा. नाहीतर आम्हाला घरी पाठवावे लागेल, असंही राणे यावेळी म्हणाले. राणेंच्या सभेदरम्यान काही शिवसैनिक घोषणाही देत होते. त्यांना गप्प करण्यासाठी राणे यांनी हा टोला लगावला.
संगमेश्वर इथं भाजप-शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आले आणि मोठा गोंधळ सुरु झाला. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते जोरदार घोषणा देत होते. ‘नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या वक्तव्याचं भाजप समर्थन करणार नाही. मुख्यमंत्रिपद हे महत्वाचं पद आहे. त्यामुळे त्या पदाबद्दल किंवा त्या पदावरील व्यक्तीबद्दल बोलताना संयम ठेवावा,राणेंच्या वक्तव्याला भाजपचे समर्थन नसले तरीही भाजप राणेंच्या पाठीशी उभा राहणार’, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- आमच्या विरुद्ध, आमच्या पत्नीच्याविरुद्ध तुम्ही काय काय केलंत ? फडणविसांनी साधला सत्ताधाऱ्यांवर निशाणा
- नारायण राणेंच्या घराबाहेर शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांचा तुफान राडा, पोलिसांचा लाठीचार्ज; पाहा हा व्हिडिओ
- ‘नारायण राणे छक्का है, नारायण राणे भडवा है!’, संतप्त शिवसैनिकांची घोषणाबाजी
- ‘माझी बदनामी केली तर तुमच्याविरोधात गुन्हा दाखल करेन’, नारायण राणेंची वृत्तवाहिन्यांना धमकी
- ‘…अन्यथा पोलीस आयुक्तालयाबाहेर आंदोलन करायला बसू’ ; फडणवीसांचा इशारा


