Share

‘…अन्यथा पोलीस आयुक्तालयाबाहेर आंदोलन करायला बसू’ ; फडणवीसांचा इशारा

Published On: 

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केलेल्याआक्षेपार्ह विधाणामुळे आज सकाळपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ माजली आहे. या विधानामुळे संपूर्ण राज्यभारत तीव्र पडसाद उमट आहेत. राणेंच्या वक्तव्यानंतर शिवसेना-भाजप आमने-सामने आले आहेत. शिवसेनेचे नाशिकमधील शहाराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी नारायण राणेंविरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मुंबई येथे पत्रकार परिषद घेत आहेत. यावेळी बोलताना त्यांनी नारायण राणेंच्या पाठीमागे भारतीय जनता पार्टी खंबीरपणे उभे राहणार आहे असे सांगितले आहे. तसेच यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘ राणेंनी जे वक्तव्य केलं आहे. तो कायदेच्या भाषेत दखलपात्रं गुन्हा नाही. परंतु आता आमच्या कार्यालयावर दगडफेक केली जात आहे ते आम्ही हे खपवून घेणार नाही. दगडफेक करणाऱ्यांना सोडणार नाही,’ असा इशाराही त्यांनी दिला.

तसेच ‘शिवसैनिक दगडफेक करत आहेत, ते म्हणतात आम्ही उद्धवजींच्या आदेशाने करत आहोत. भाजपच्या कार्यालयावर हल्ला केला तर खबरदार, आम्ही हिंसा करत नाही, पण आमच्या कार्यालयावर हल्ला केला तर आम्ही सहन करणार नाही. आमच्या कार्यालयावर दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई केली नाही तर आम्ही त्या त्या पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर जाऊन आंदोलन करु. हे कायद्याचं राज्य आहे, तालिबान नाही.’ असा इशारा यावेळी फडणवीसांनी दिला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!