Share

आमच्या विरुद्ध, आमच्या पत्नीच्याविरुद्ध तुम्ही काय काय केलंत ? फडणविसांनी साधला सत्ताधाऱ्यांवर निशाणा

Published On: 

मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. राणेंच्या वक्तव्यानंतर शिवसेना-भाजप आमने-सामने आले आहेत. शिवसेनेचे नाशिकमधील शहाराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी नारायण राणेंविरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, मुंबईतील राणेंच्या बंगल्याजवळ युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले असून भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले होते. यावेळी काहीप्रमाणात दगडफेक सुद्धा झाली असून यात काही पोलीस जखमी झाल्याचे देखील सांगितले जात आहे. दोन्ही बाजूने जोरदार घोषणा दिल्या जात असून मोठा तणाव सध्या त्याठिकाणी पाहायला मिळत आहे.यावेळी पोलिसांना याठिकाणी सौम्य लाठीचार्ज करावा लागला.

दरम्यान, या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. राणेंच्या वक्तव्याचे फडणवीस यांनी समर्थन केले नाही मात्र सरकारमधील नेत्यांना आणि पोलिसांना देखील त्यांनी खडेबोल सुनावले. यावेळी पोलिसांनी कायद्याने काम करावे असा सल्ला देखील दिला आहे. सरकार पोलिसांचा गैरवापर करत असेल तर भाजप राणे साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहोत असे ते म्हणाले.

यावेळी बोलताना फडणवीस यांनी सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यांची आठवण करून दिली. आम्ही आमचं तर काही सांगतच नाही. आमच्या विरुद्ध, आमच्या कुटुंबाच्या विरुद्ध, आमच्या पत्नीच्या विरुद्ध तुम्ही काय काय केलं तो आमचा वयक्तिक मामला आहे. त्यासाठी आम्ही सक्षम आहोत.त्यामुळे तो माझा प्रश्नच नाहीये. माझं केवळ इतकंच म्हणणे आहे की दुटप्पी भूमिका असू नये. भूमिका एकचं असायला हवी असं ते म्हणाले.

नारायण राणे नेमकं काय म्हणाले होते ?

‘देशाच्या स्वातंत्र्याला किती वर्षे झाली हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना माहिती नाही. कुणाला तरी विचारतात हिरक महोत्सव आहे काय? मी असतो तर कानाखाली चढवली असती. देशाच्या स्वातंत्र्यदिनाची माहिती नसावी? किती चीड आणणारी गोष्ट आहे. बाजुला एखादा सेक्रेटरी ठेव आणी बोल म्हणावं. सरकार कोण चालवतंय ते कळतच नाही. ड्रायवरच नाही’, असे भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!