Share

अहंकार बाजूला ठेवून ‘या’ दोन अपेक्षा पूर्ण कराच ; संजय राऊतांचे भाजपला खुले आव्हान

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व असा विजय मिळवला आहे. भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेसह अन्य पक्षांनी मोठे प्रयत्न केले मात्र भाजपने विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत महाराष्ट्र एकीकरण समिती सह सर्वांना अस्मान दाखवले.

बेळगाव महापालिका स्थापन झाल्यापासून महाराष्ट्र एकीकरण समितीची अबाधित असणारी सत्ता या निकालानंतर संपुष्टात आली. भाजपने ३५ जागा मिळवत प्रथमच महापालिकेवर प्रथमच आपला झेंडा लावला आहे. तर बेळगावात मराठी माणसांचा पराभव घडवून आणला, असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केला होता.

त्यावर बेळगावात भगवा झेंडाच फडकला आहे असा दावा भाजपने केला आहे. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता ट्वीट भाजपला खुले आव्हान दिले आहे. महाराष्ट्र भाजपा कडून दोन अपेक्षा आहेत. एक म्हणजे बेळगावातील विजयी मराठी उमेदवारांना मुंबईतील हुतात्मा स्मारका समोर डोके टेकून महाराष्ट्र अस्मितेची शपथ घ्यायला लावा आणि दुसरी बेळगाव पालिकेत महाराष्ट्र त विलीन होण्या बाबत दोन ओळींचा ठराव मंजूर करा,आहे मंजूर? अहंकार बाजुला ठेवुन हे एवढे कराच.’ अशी मागणी आता राऊत यांनी ट्वीट करून केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!