मुंबई – दरड कोसळून घाट बंद झाल्याने उपचारासाठी दवाखान्यात पोहोचू न शकलेल्या महिलेचा रस्त्यातच मृत्यू झाला आहे. नंदुरबारमधल्या चांदसैली घाटातील ही घटना आहे. कालपासून घाटात दरड कोसळून रस्ता झाला बंद झाला आहे. सिदलीबाई पाडवी या महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले जात होते. रस्ता बंद असल्याने सिदलीबाई पाडवी यांच्या पतीवर त्यांना खांद्यावर टाकून पायी चालत जाण्याची वेळ आली. या प्रवासादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
आपल्या पत्नीला लवकरात लवकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी पतीने शर्थीचे प्रयत्न केले पण त्यांच्या प्रयत्नाला यश आले नाही. अखेर सिदलीबाई यांनी वाटेतच प्राण सोडले. जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच वाटेत त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे अवघा महाराष्ट्र हळहळला असून ग्रामीण भागात रस्ते आणि आरोग्य व्यवस्था कशी आहे हे देखील या निमित्ताने समोर आले आहे.
या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी भाष्य केले आहे. नंदुरबार जिल्हा-चांदसैली दरड कोसळून २४ तासाहून अधिक वेळ झाला तरी ही रस्ता पुर्ववत न झाल्याने सिल्लीबाई पाडवी या महिलेला वेळेत उपचार न मिळाल्याने रस्ता बंद असल्याने ती जिल्हा रूग्णालयात पोहोचू शकली नाही व त्यात तिचा मृत्यू झालेला आहे. तिचा पती खांद्यावर ;सिदलीबाईला घेऊन अनवाणी फिरतोय. अत्यंत ह्रदयद्रावक व दुदैवी अशी ही घटना घडलीये
या घटनेनंतर राज्यातील ग्रामीण भागातील आरोग्यव्यवस्थेचे वाभाडे निघालेले पहायला मिळताहेत ग्रामीण भागात आरोग्यव्यवस्था सुदृढ असती तर सिदलीबाईचा जीव वाचला असता हे नक्की. विशेष म्हणजे राज्याचे आदिवासी मंत्री के.सी.पाडवी यांच्या मतदारसंघातील ही घटना आहे असं चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मुंबई महापालिकेच्या शाळेत केंब्रिज बोर्ड सुरू होणार’, आदित्य ठाकरेंची घोषणा
- मुख्यमंत्र्यांचे ‘खास’ नार्वेकर यांचा बंगला तोडला, आता परब आणि सरनाईक यांचा नंबर – सोमय्या
- पुरुषप्रधान संस्कृती मागे टाकत ५ मुलींनी आपल्या आईच्या पार्थिवाला दिला खांदा
- ‘न सांगताही नांदेडमध्ये हजारो लोक जमा झाले, सांगून बघू का?’ मग बघा!
- माझ्यामुळे काही मंत्र्यांची झोप उडाली आहे, त्यामुळे ते भाई लोकांची मदत घेत आहेत – सोमय्या


