इंग्लंड : भारताचा स्टार क्रिकेटपटू केएल राहुल व प्रसिद्ध बॉलिवूड सुपरस्टार सुनील शेट्टी यांची मुलगी अथिया यांच्या नात्याबद्दल अनेकदा सोशल मीडियात चर्चेला उधाण येत असते. दोघांनीही अधिकृतरीत्या आपल्या नात्याबद्दल स्पष्टता केली नसली; तरी अनेक वेळा त्यांचे विविध फोटो समोर येत असतात. त्यामुळे त्यांच्या रिलेशन बाबतच्या चर्चा नेहमीच सोशल मीडियावर जोर धरून असतात.
केएल राहुल सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. त्याच्या सोबत अथिया शेट्टी देखील इंग्लंड दौऱ्यावर आहे. आथियाने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. जो फोटो अथियाने शेअर केला होता तो फोटो लंडन मधला असल्याचे समजले होते त्यामुळे अथिया देखील केएल राहुल सोबत लंडनमध्ये असल्याच्या चर्चा आहेत.

अभिनेत्री आथिया शेट्टी आणि केएल राहुल हे दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याची काही दिवसांपासून चर्चा आहे. मात्र, के.एल. राहुलने आता या वृत्ताला दुजोरा दिला असून ती माझी गर्लफ्रेंड असल्याचे म्हटले आहे.
एका प्रसिद्ध वृत्त वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, ‘ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेपासूनच दोघे सोबत आहेत. विशेष म्हणजे इंग्लंड दौऱ्यात के.एल. राहुलने लॉजिस्टीक विभागाला दिलेल्या कागदपत्रांमध्ये अथिया शेट्टी हिचा पार्टनर असा उल्लेख केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून चिंता व्यक्त
- ‘लोकांच्या लक्षातही येणार नाही अशा प्रकारे मोदी सरकार खिसा कापत आहे’
- पंतप्रधान मोदी युवकांना म्हणाले, ‘ज्याच्याकडे स्किल असेल तोच पुढे जाईल’
- …अन्यथा आमचा लढा पुन्हा सुरु करु, खासदार संभाजी छत्रपतींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- आमिर-किरणचा एकत्र डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

