अहमदनगर: रशिया-युक्रेन युद्धाचे (Union Minister Ramdas Athavale) पडसाद सर्व जगावर उमटत आहेत. अशा युद्धजन्य परिस्थितीने सर्वच जगणे धास्ती घेतली आहे. रोज येथील युद्धाचे व्हिडिओ मन हेलावून टाकत आहे, तर दुसरीकडे या परिस्थितीवर आधारित केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Union Minister Ramdas Athavale) यांनी कविता केली आहे.
कवितेसाठी ओळखले जाणारे केंद्रीय मंत्री आठवले आपल्या कवितेत म्हणतात की, “पुतीनचा बिघडला आहे ब्रेन…म्हणून परेशान आहे युक्रेन”, अशा शब्दांत त्यांनी कविता करून रशिया – युक्रेन युद्ध थांबून चर्चेतून मार्ग काढावा आणि शांती प्रस्थापित झाली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
तसेच यावेळी त्यांनी छत्रपती संभाजीराजेंच्या उपोषणावरही भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, “मराठा आरक्षणाला आरपीआयचा पूर्ण पाठिंबा आहे. संभाजीराजे आमचे जवळचे मित्र आहेत, त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंनी मोठा आवाज उठवला होता. महाराष्ट्र पिंजून काढत त्यांनी मराठा समाजाला जागृत केले होते. त्यामुळे मी २ मार्चला आझाद मैदानात त्यांच्या आंदोलनाला भेट देणार.”
महत्वाच्या बातम्या:
IND vs SL : श्रीलंका विरुद्ध भारतीय संघाचा ऐतिहासिक विजय ; रचले नवीन रेकॉर्ड
“…ते असते तर म्हणाले असते, ‘आनंद वन भुवनी’; राज्यपाल कोश्यारींचे मोठे वक्तव्य
Russia-ukraine War:आक्रमक रशिया विरोधात एलोन मस्कची युक्रेनला महत्वाची मदत
- Russia-ukraine War: अमेरिकेतील ९/११ हल्ल्याचा फोटो शेअर करत युक्रेनने व्यक्त केला संताप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

