Share

भारतीय जनता पक्षातील नेत्याचा शिवसेनेला इशारा

Published On: 

मुंबई : सध्या महाराष्ट्र राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुकांचा हंगाम सुरु झाला आहे. काहीच दिवसात राज्यातील निवडणूक आयोग राज्यातील १० महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार आहे. मुंबई- पुण्यासह महाराष्ट्रातील १० महापालिका मार्च महिन्याच्या अखेरीस होणार आहेत. मात्र त्याकरता राजकीय वातावरण आतापासूनच तापायला सुरुवात झाली आहे.

त्यातच आज अमित साटम य़ांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवसेनेची मुंबई महानगरपालिकेतील सत्ता उलथवून टाकल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा सज्जड इशारा भारतीय जनता पक्षाचे आमदार अमित साटम यांनी शिवसेनेला दिला आहे. शिवसेनेवर टीका करत आज भारतीय जनता पक्षाचे आमदार अमित साटम म्हणाले कि ,” गेले २५ वर्ष मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. गेल्या २५ वर्षाच्या कालावधीत मुंबई महानगरपालिकेमध्ये ३ लाख कोटींपेक्षा जास्त भ्रष्टाचार झाला आहे. आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही असत्य विरुद्ध सत्य ,अन्याय विरुद्ध न्याय, अधर्मा विरुद्ध धर्माची, मुंबईकर विरुद्ध आदित्यसेनेची असणार आहे अश्या शेलक्या शब्दात भारतीय जनता पक्षाचे आमदार अमित साटम यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

भारतीय जनता पक्षाचे आमदार अमित साटम यांनी ट्विट करत शिवसेनेला डिवचले आहे. मुंबई महारानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाचीच सत्ता येणार असून आम्ही सत्तेत आल्यावर शिवसेनेच्या भ्रष्टाचाराची सर्व प्रकरणे बाहेर काढणार आहोत असाही इशारा भारतीय जनता पक्षाचे आमदार अमित साटम  यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!