Share

IND vs SL : श्रीलंका विरुद्ध भारतीय संघाचा ऐतिहासिक विजय ; रचले नवीन रेकॉर्ड

Published On: 

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंका विरुद्ध टी २० मालिका जिंकत नवीन इतिहास रचला आहे. ३ सामन्यांच्या टी २० मालिकेत भारताने लंकेला ३-० ने क्लीन स्वीप केले आहे. या विजयासह टीम इंडियाने सर्वाधिक सलग T20I विजयांच्या यादीत अफगाणिस्तान आणि रोमानियाशी बरोबरी केली. भारताने १२ सामन्यांपैकी बॅक-टू-बॅक १२ विजय मिळवले आहेत.

कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ नवीन शिखर गाठत आहेत. भारतीय संघासाठी हा या वर्षातील सलग तिसरा मालिका विजय असणार आहे. याआधी भारतीय संघाने वेस्ट इंडिजला एकदिवसीय आणि टी २० सामन्यात परास्त केले होते. रोहितच्या टीम इंडियाने खेळाच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये इतिहास रचला आहे. टीम इंडियाने न्यूझीलँडला मागे सोडत टी २० फॉरमॅटमध्ये सलग सर्वाधिक विजय मिळवण्याच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली आहे. तसेच घरच्या मैदानावर भारतीयांसाठी हा ४०वा विजय ठरला.

शेवटच्या टी २० सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेला ६ विकेट्सने पराभूत केले आहे. भारतासाठी श्रेयस अय्यरने पुन्हा विजयी खेळी केली आहे.श्रीलंकेच्या १४६ धावांचा पाठलाग करताना अय्यरने भारतासाठी ७३ धावांची खेळ करून विजय मिळवून दिला. तसेच गोलंदाजीत भारताकडून आवेश खानने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. टी २० मालिकेतही विजय घोडदौड सुरु ठेवलेल्या भारतीय संघाचे पुढचे लक्ष्य कसोटी मालिकेकडे असेल.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!