औरंगाबाद: मराठी भाषा गौरव दिन आणि दासनवमीनिमित्त समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) प्रमुख पाहुणे म्हणून काल (२७ फेब्रुवारी) उपस्थित होते. यावेळी त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, “भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना राम मंदिराचा शिलान्यास झाला. तेव्हा समर्थ रामदासांचे नाव आठवत होते. ते असते तर म्हणाले असते, ‘आनंद वन भुवनी’ असे राज्यपाल कोश्यारी यांनी म्हटले आहे.
तसेच “संत ज्ञानेश्वरांपासून मराठी भाषेला संत साहित्याची मोठी परंपरा लाभलेली आहे. मात्र यामध्ये समर्थ रामदासांच्या साहित्याचेही स्थान महत्त्वाचे असल्याचे राज्यपालांनी म्हटले आहे. समर्थानी, ‘‘प्रभाते मनी राम चिंतीत जावा’’, ‘‘मना सज्जना भक्ती पंथेची जावे’’,‘‘जनी िनद्यते ते सर्व सोडूनी द्यावे’’ या आणि यांसारख्या एकापेक्षा एक सरस रचनेतून मानवी जीवनात सदाचाराचे असलेले महत्त्व अधोरेखित केले आहे. त्यामुळे सदाचरण अत्यंत महत्वाचे असते, कारण बलाढय़ रावणासमोर राम विजयी होण्यामागे त्याचे सदाचरणच कारणीभूत होते.” असेही राज्यपाल कोश्यारी यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
Russia-ukraine War:आक्रमक रशिया विरोधात एलोन मस्कची युक्रेनला महत्वाची मदत
Russia-ukraine War: अमेरिकेतील ९/११ हल्ल्याचा फोटो शेअर करत युक्रेनने व्यक्त केला संताप
BJP VS TMC : बंगालमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना हिंसाचाराचे गालबोट
- ईडीच्या धाडींवर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘आम्ही हा त्रास सहन करायला…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

