Share

Russia-ukraine War:आक्रमक रशिया विरोधात एलोन मस्कची युक्रेनला महत्वाची मदत

Published On: 

मुंबई : सध्या रशिया आणि युक्रेन या दोन देशात युद्ध चालू आहे. आक्रमक रशिया समोर युक्रेनच्या सैन्याचा निभाव लागणे हे अत्यंत कठीण आहे. रशियाचे सैन्य जगातील सर्वात दुसरे ताकदवान लष्कर / सैन्य आहे. तर युक्रेनचा क्रमांक जगातील ताकदवान लष्करात २२ वा क्रमांक लागतो. युक्रेन रशियाच्या आक्रमणासमोर टिकणार नाहीये हे जगातील सर्वच देशांना माहिती आहे. त्यामुळे जगातील महत्वाचे देश आपल्या आपल्या परीने युक्रेनला मदत करत आहेत.

त्यातच आज जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी असणाऱ्या एलोन मस्कने युक्रेनला मदत केली आहे. रशियाच्या प्रचंड आक्रमणामुळे  युक्रेनची संपर्क यंत्रणा बेचिराख झाली आहे . त्यामुळे युक्रेनच्या डिजीटल ट्रान्सफॉर्मेशन मंत्र्यांनी एलोन मस्कला मदतीची विनंती केली होती. ती आज एलोन मस्कने मान्य केली आहे. ही मदत युक्रेनला अत्यंत महत्वाची ठरणार आहे. या मदतीनुसार आता एलोन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीने स्टारलिंक ही आपली अत्याधुनिक ब्रॉडबँड सेवा युक्रेनमध्ये सुरू केली आहे. एलोन मस्कची यांनी युक्रेनच्या मंत्र्यांना ट्विट करत आपण युक्रेनमध्ये  स्टारलिंक ही  आपली अत्याधुनिक ब्रॉडबँड सेवा सुरु केली आहे अशी माहिती दिली.

युक्रेनच्या  डिजीटल ट्रान्सफॉर्मेशन मंत्र्यांनी एलोन मस्कला विनंती केल्याच्या दिवसापासून १० दिवसाच्या आत एलोन मस्क यांनी ही अतिशय ताकदवान इंटरनेट सेवा युक्रेनमध्ये सुरु केली आहे ; या मदतीमुळे एलोन मस्क यांचे जगभरातून कौतुक होत आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!