🕒 1 min read
मुंबई : सध्या युक्रेन आणि रशिया या युरोप खंडातील दोन देशांमध्ये युद्ध चालू आहे. रशियाचे सैन्य जगातील सर्वात ताकदवान सैन्यापैकी एक असल्याने युक्रेनचा रशिया समोर निभाव लागणे अत्यंत कठीण आहे. असे असले तरी युक्रेनची जनता खंबीर पणे रशियाच्या आक्रमणाचा सामना करत आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध (Russia Ukraine War) सुरू आहे. रशिया आधुनिक शस्त्रे, बॉम्ब आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले करत आहे. त्यातच आज युक्रेनची राजधानी असलेल्या कीव शहरात आज मोठ्या प्रमाणात बॉम्ब वर्षाव करण्यात आला आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात सैनिकी आक्रमण झाल्याने युक्रेनच्या गृहमंत्रालयाने आज अमेरिकेवरील ९/११ हल्ल्याचे फोटो शेअर करत त्याची तुलना रशियाच्या आक्रमणाशी केली आहे. या फोटोद्वारे युक्रेनच्या गृहमंत्रालयाने रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यावर टीका केली आहे.
या फोटो मध्ये अमेरिकेवर ९/११ च्या हल्ल्यावेळी ट्विन टॉवर कोसळतानाचा फोटो आहे; त्याचबरोबर रशियाच्या लष्कराने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे युक्रेनची राजधानी कीव शहरातील एक इमारत कोसळत आहे अश्या आशयाचा फोटो शेअर केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- BJP VS TMC : बंगालमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना हिंसाचाराचे गालबोट
- “भाजपशासित राज्यांमध्ये इन्कमही नाही आणि टॅक्सही नाही”, राऊतांचा हल्लाबोल
- “भारतीय ध्वज पाहून…”, युक्रेनमधून परतलेल्या बिहारच्या विद्यार्थ्याने सांगितली आपबिती
- दिशा सालियन बदनामी प्रकरणी राणे पितापुत्रांवर गुन्हा दाखल
- लवासाप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा शरद पवारांना धक्का


