Share

उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी पुष्कर सिंह धामी विराजमान !

Published On: 

डेहराडून : काही महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या तीरथ सिंह रावत यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता तीरथसिंग रावत यांनी राज्यपालांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सोपविला होता. त्यानंतर आता भारतीय जनता पक्षाचे आमदार पुष्कर सिंह धामी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

४५ व्या वर्षांच्या धामी यांनी आज डेहराडूनमध्ये मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ते उत्तराखंडचे सर्वाधिक तरुण मुख्यमंत्री ठरले आहेत. राज्यपाल बेबीरानी मौर्य यांनी धामी यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. धामी उत्तराखंडचे ११ वे मुख्यमंत्री ठरले आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर सतपाल महाराज, हरकसिंग रावत, डॉ. धनसिंग रावत, बन्सीधर भगत, यशपाल आर्य, सुबोध उनियाल, अरविंद पांडे, बिशनसिंग, गणेश जोशी, रेखा आर्य आणि यतिश्वरानंद यांना पदाची शपथ दिली गेली. मंत्री झालेल्या सर्व आमदारांचा यापूर्वी मंत्रिमंडळात समावेश होता.

पिथौरागडमध्ये जन्मलेले 45 वर्षांचे पुष्करसिंह धामी हे राज्यातील सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. दोन वेळा आमदार राहिलेले धामी उत्तराखंड सरकारमध्ये कधी मंत्रीही झाले नव्हते, परंतु आता ते थेट मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारतील.

पुष्कर सिंह धामी हे भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत. तसेच, ते आरएसएसचे जवळचे मानले जातात. पुष्कर सिंह धामी हे ऊधमसिंह नगर जिल्ह्यातील खटीमा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ते दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. पक्षातील तरुण आणि अभ्यासू आमदार म्हणून त्यांची ओळख आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!