पुणे : महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मार्च महिन्यापासून झपाट्याने वाढत होती. परंतु, हळूहळू ही रुग्णसंख्या आता आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. असं असलं तरी संभाव्य तिसऱ्या लाट आणि डेल्टा प्लस व्हेरियंट प्रसार हे अधिक धोकादायक असल्याने राज्य सरकारने राज्यभरात पुन्हा कडक निर्बंध लावले आहेत.
तर, पुणे शहरात मे महिन्याच्या मध्यानंतर कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत घसरण सुरु होती. दिवसाला ७-८ हजारांच्या घरात गेलेली होती. ही रुग्णसंख्या आता शेकड्याच्या घरात आली असली तरी नव्या बाधितांची संख्या ही वाढत आहे. अशा वेळी पुणेकरांनी बेफिकिरी न करता अधिक काळजी घेऊन नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट आधी ४.६ टक्के इतका होता आता हा रेट ५.३ हुन अधिक झाला आहे.
दरम्यान, आज (दि. ०४ जुलै) रोजी पुणे शहरात तब्बल ३१६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ७९ हजार ७३२ इतकी झाली आहे. शहरातील ३२९ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ६८ हजार ३३७ झाली आहे.
सक्रिय रुग्णसंख्या ही २७०० वर गेलीये. पुणे शहरात सध्या २ हजार ७८३ ऍक्टिव्ह (सक्रिय) रुग्ण आहेत. त्यापैकी २९७ रुग्ण गंभीर तर ४३९ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्याने ६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- राज्य सरकारने आता तरी विद्यार्थी व बेरोजगार युवकांच्या भावना समजून घ्याव्यात – दरेकर
- ‘सरकारच्या दडपशाहीसमोर मराठा समाज कधीही झुकणार नाही’; चंद्रकांत पाटलांचा हुंकार
- मराठा आक्रोश मोर्चा : ‘आता तारीख देणार नाही, थेट ऍटॅक करू’; नरेंद्र पाटलांचा इशारा
- अबब ! महाविकास आघाडी सरकारने प्रसिद्धी मोहिमेवर केले तब्बल १५५ कोटी खर्च
- ‘एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या करावी’ ; स्वप्निलच्या आईचा तळतळाट


