औरंगाबाद : लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या पथविक्रेत्यांना पुन्हा व्यवसाय सुरू करता या उद्देशाने केंद्र सरकारने पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर योजना जाहीर केली आहे. ही योजना दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीवीका अभियानाच्या अंतर्गत राबवली जात आहे. यात आजवर २,१९० फेरीवाल्यांना कमी व्याजदराने दहा हजार रुपयांचे कर्ज वाटप झाले आहे. तर २,१४९ लाभधारक सध्या प्रतिक्षेत आहेत. आजवर या योजनेसाठी ८ हजार ३०४ फेरीवाल्यांनी अर्ज दाखल केले आहेत.
औरंगाबाद महापालिकेकडे शहरातील १४ हजार फेरीवाल्यांनी आजवर नोंदणी केलेली आहे. या हातावर पोट असणार्या व्यावसायिकांना आर्थिक मदत मिळावी, यासायठी देशभरात ही योजना राबवली जात आहे. त्यानुसार पालिकेकडे नोंदणीकृत आणि नोंदणी नसलेले फेरीवाले या योजनेचा लाभ घेत आहेत. ज्या फेरीवाल्यांची नोंदणी आहे, त्यांना थेट या योजनेचा लाभ मिळवून दिला जात आहे. तर ज्यांची नोंदणी नाही, त्या फेरीवाल्यांची पालिकेच्या टीमकडून आधी पाहणी केली जाते.
त्याच्या व्यवसायाची पाहणी केल्यानंतर या योजनेत सहभागी करून घेतले जाते. मागील सहा महिन्यात नोंदणी कलेल्या फेरीवाल्यांनी याचा लाभ घेतला आहे. अतिरीक्त आयुक्त बी.बी. नेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली भरत मोरे, सुरेंद्र पाटील, शेख अब्दुल माजिद, सय्यद शोहेब हे योजनेचे काम पाहत आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली. लाभधारकांनी मिळालेले कर्ज दहा टप्प्यांत फेडणे अपेक्षित आहे.
मात्र काही लाभधारक नियमित हप्ते भरत नाही. त्यामुळे पुढील अर्जदारांना कर्ज देण्यास बँका पुढे येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेणार्यांनी त्याची परतफेड करावी, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. हे कर्ज मिळवून देतो, असे सांगत काही एजंट देखील शहरात लोकांची फसवणूक करीत आहे, अशांपासून सावध राहण्याचेही पालिकेने सूचित केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘औरंगाबादचे जिल्हाधिकारी खुर्चीच्या मस्तीत, त्यांना जनतेची काळजी नाही’, मनसेचा आरोप
- राज्य सरकारने आता तरी विद्यार्थी व बेरोजगार युवकांच्या भावना समजून घ्याव्यात – दरेकर
- अभिमानास्पद : महाराष्ट्राने केला लसीकरणाचा राष्ट्रीय विक्रम
- चेक देतांना विचार करुनच द्या, चेक बाऊन्स प्रकरणात १२५ जणांविरोधात मनपाची कारवाई!
- १५ हजार लसींचा साठा दोनच दिवसात संपला! औरंगाबादेत जम्बो लसीकरण मोहिमेला पुन्हा ब्रेक


