Share

‘प्रसिद्धीसाठी १५५ कोटी खर्च ; काहीही काम न करता कसली प्रसिद्धी करता ?’

Published On: 

मुंबई : राज्यावर कोरोनाचं संकट ओढावल्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट पाहण्यास मिळाला होता. राज्य सरकारने काटकसर करण्याचे धोरण अंगीकारले होते. मात्र, महाविकास आघाडी सरकारने मागील 16 महिन्यात प्रसिद्धी मोहिमेवर तब्बल 155 कोटी खर्च केले असल्याची माहिती समोर आली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे माहितीच्या अधिकारात प्रसिद्धीवर खर्चाबद्दल माहिती मागितली होती. महासंचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, 155 कोटी खर्च केल्याचं समोर आले आहे. या मुद्याला धरून आता विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र डागायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे.

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते बोलताना म्हणाले कि, ‘महाविकास आघाडी सरकारने ह्या वर्षीचे त्यांचे प्रसिद्धीसाठीचे बजेट २४६ कोटी रुपये केले आहे. जे कि आमच्या काळात २६ कोटी रुपये होते. महाविकास आघाडी नेमकी कशाची प्रसिद्धी करत आहे? काम तर सगळेच बंद आहेत, नवीन काम कोणतेही सुरु झालेले नाही मग नेमकी कशाची प्रसिद्धी चालू आहे? आणि कोणाची प्रसिद्धी चालू आहे ?’ असे सवाल फडणवीस यांनी उपस्थित केले आहेत.

‘काम काहीच नसताना १५०-१५० कोटींचा खर्च केला जातोय त्यामुळे हि नेमकी कोणाची प्रसिद्धी केली जात आहे ? याची माहिती महाराष्ट्राला मिळाली पाहिजे तसेच तिन्ही पक्षाच्या कोण कोणत्या नेत्याच्या प्रसिद्धीसाठी किती खर्च झाला याची माहिती देखील समोर आली पाहिजे.’ अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!