Share

औट्रम घाटाची माहिती सांगणारा शिलालेख सापडला, दळवळणाच्या इतिहासाची देतोय साक्ष!

Published On: 

औरंगाबाद : भारताच्या इतिहासाची साक्ष देणारे अनेक शिलालेख, प्राचीन वास्तू आणि दस्तऐवज आजही उपलब्ध आहेत. यात अगदी प्राचीण काळापासून ते इंग्रजी सत्ता भारतावर असल्यापासूनच्या वास्तूंचा समावेश आहे. असाच एक ऐतिहासिक दस्ताऐवज म्हणजेच औट्रम घाटाची माहिती देणारा शिलालेख सापडला आहे. यामुळे भारतात दळवळणाच्या सुविधा कशा प्रकारे निर्माण झाल्या याचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांना त्याचा फायदा होणार आहे.

या संदर्भात जळगावचे खासदार उन्मेश पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली. ते म्हणाले की, ‘देशाच्या दळणवळणामध्ये महत्त्वाची भूमिका निभावणारा औट्रम घाट अर्थात कन्नड घाटाचे अभियंता सर औट्रम यांची माहिती असलेला शिलालेख धरणगाव जि.जळगाव येथे आढळून आला आहे. या शिलालेखावरील माहिती आज सर्वांसमोर आल्याने खानदेशाच्या पुरातन कालीन माहिती आपल्याला पुन्हा एकदा उपलब्ध झाली आहे.’

https://twitter.com/UnmeshPatilBjp/status/1411623064543006725

सध्या पुन्हा एकदा औट्रम घाट चर्चेत आहे. देशातील दळवळणात या घाटाची महत्त्वाची भूमिका आहे. या माध्यमातून मालाची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. मात्र, अरुंद रस्ते झाल्याने या ठिकाणी होणाऱ्या बोगद्याचे काम लवकरात लवकर करण्याची मागणी होत आहे. अशा प्रकारच्या शिलालेखातून या घाटाचे ऐतिहासिक महत्त्वही पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!