औरंगाबाद : जिल्हा परिषद शाळांना शासनाकडून दरवर्षी देण्यात येणारे देखभाल अनुदान अगदीच नगण्य असते. या अनुदानात जेमतेम टपाली खर्च निघू शकेल,अशी परिस्थिती असते. त्यातच शाळेचीही रंगरंगोटी करून घ्यायची म्हटल्यास मोठी तारेवरची कसरत करावी लागते. परंतु अशा परिस्थितीतही गंगापुर तालुक्यातील दिनवाडा शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक विकास बोचरे यांनी आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर शाळेचे रुपच पालटून टाकले आहे. पाच दिवसात एकट्याने शाळेचे रंगकाम करत निस्तेज परिसराला वेगळेच रुप त्यांनी दिले आहे.
शाळेच्या भिंती रंग उडाल्याने शाळा निस्तेज वाटू लागल्या होत्या. त्यामुळे बोचरे गुरुजींनी शाळेच्या रंगरंगोटीसाठी काही रंगकाम कारागिरांकडून खर्चाची चौकशी केली. त्यावेळी ३० ते ३५ हजार रुपयांचा खर्च सांगण्यात आला. ह्याच्या अर्धेही शाळेचे बजेट नसल्याने परंतु रंगकाम पूर्ण करण्याची प्रचंड इच्छाशक्ती असल्याने त्यांनी रंग देता येणारे स्प्रे पेंटिंग मशिनच्या आधारे स्वतःच अवघ्या पाच दिवसांत संपूर्ण शाळेचे रंगकाम केले.
विद्यार्थ्यांसाठी सद्यस्थितीत शाळा बंद असल्याने शाळेत फावला. वेळही भरपूर मिळत असल्याने विकास बोचरे गुरुजींनी याचा पुरेपूर वापर करत अत्यंत आकर्षक रंगरंगोटी केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन गट शिक्षणाधिकारी, शिक्षण विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुख, केंद्रीय मुख्याध्यापक व अनेक शिक्षकांनी कौतुक केले असून त्यांच्या या दिशा दाखविणाऱ्या कार्यातून अनेक शाळांना प्रेरणा मिळू शकेल,अशी अनेक शिक्षकांकडून कौतुकास्पद थाप त्यांना मिळाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘औरंगाबादचे जिल्हाधिकारी खुर्चीच्या मस्तीत, त्यांना जनतेची काळजी नाही’, मनसेचा आरोप
- राज्य सरकारने आता तरी विद्यार्थी व बेरोजगार युवकांच्या भावना समजून घ्याव्यात – दरेकर
- अभिमानास्पद : महाराष्ट्राने केला लसीकरणाचा राष्ट्रीय विक्रम
- चेक देतांना विचार करुनच द्या, चेक बाऊन्स प्रकरणात १२५ जणांविरोधात मनपाची कारवाई!
- १५ हजार लसींचा साठा दोनच दिवसात संपला! औरंगाबादेत जम्बो लसीकरण मोहिमेला पुन्हा ब्रेक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

