Share

‘गोपीनाथराव नाहीत म्हणून सत्ता गेली, ते असते तर सत्तेत विभाजन झालं नसतं’

Published On: 

बीड : माजी केंद्रीय मंत्री स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून केंद्र सरकारच्या डाक विभागाने त्यांचे पोस्टल इन्व्हलप (लिफाफा) काढले आहे. या लिफाफ्याचे विमोचन ऑनलाईन करण्यात आले. नवी दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, खासदार डॉ. प्रितम मुंडे, खासदार भागवत कराड, रासप नेते महादेव जानकर आदी नेते उपस्थित होते.

दरम्यान, महादेव जानकर हे भावुक झाल्याचं दिसून आलं. बापाचं छत्र गेल्यानंतर मुलगा अनाथ होतो, तसा मी झालो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. एका माध्यमाशी बोलताना त्यांनी गोपीनाथराव मुंडे नसल्याने राजकीय नुकसान देखील झाल्याची खंत व्यक्त केली.

‘गोपीनाथराव हे सामान्य माणसाला घडवणारे महानायक होते. मी पंकजा मुंडे यांच्या सुखाऐवजी दुःखात जास्त सहभागी आहे. बापाचं छत्र गेल्यानंतर मुलगा अनाथ होतो. तसा मी झालो. मुंडे साहेब आज असते, तर सत्तेत विभाजन झालं नसतं. मुंडे साहेब बापमाणूस होते, गोपीनाथराव नाहीत म्हणून सत्ता गेली. मात्र राष्ट्रीय समाज पक्ष एनडीए सोबत आहे,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिली आहे.

पुढे ते म्हणले, ‘गोपीनाथ मुंडे आज असते तर महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळी परिस्थिती पाहायला मिळाली असती. गोपीनाथ रावांच्या जाण्यानं मोठं नुकसान झालं, त्याची जाणीव ही पदोपदी येते.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!