मुंबई : कोरोना संसर्गामुळे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतात सुरु असलेली आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आली. यानंतर स्पर्धेचे उर्वरीत सामने कधी आणि कुठे होणार असे प्रश्न विचारले जाऊ लागले. यादरम्यान २९ मे रोजी बीसीसीआयने एक बैठक बोलावली आणि आयपीएल २०२१ स्पर्धेचे उर्वरीत सामने युएई मध्ये होणार असल्याची घोषणा केली आहे.
आयपीएल स्थगिती नंतर परदेशातील सर्व खेळाडू आपल्या घरी परतले आहेत. मायदेशी परतल्यानंतरही खेळाडू आयपीएलला मिस करताना दिसत आहेत. आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानंतर डेव्हिड मिलर देखील दक्षिण आफ्रिकेला परतला आहे. सध्या तो घरी असून या वेळेचा उपयोग करण्यासाठी सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय झाला आहे. मिलरनं सोशल माीडियावर फॅन्सच्या प्रश्नांना उत्तरं दिली. या सेशनच्या दरम्यान त्याला चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मिलरनं दिलेलं उत्तर सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
One of my favourite cricketers.. Best finisher I’ve seen, very humble and love his calm demeanour https://t.co/JrCGv2HnuP
— David Miller (@DavidMillerSA12) June 2, 2021
‘महेंद्रसिंह धोनी हा माझा आवडता क्रिकेटपटू आहे. बेस्ट फिनिशर. तो अतिशय शांतवृत्तीचा आणि नम्र स्वभावाचा आहे.’ अशी प्रतिक्रिया मिलरनं दिली आहे. यानंतर मिलरनं भारतीय चाहत्यांची पुन्हा एकदा मनं जिंकली आहते.
महत्वाच्या बातम्या
- कौतुकास्पद : जागतिक बँकेचे शिक्षण विषयक सल्लागार म्हणून डिसले गुरुजी यांची नियुक्ती
- ‘लसीकरणाबाबत केंद्राची पॉलिसी स्पष्ट नाही; रोज नवीन नियमांची होतेय घोषणा’
- ‘ते ट्विट मी केलं नव्हतं तर…’ सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर महापौरांची सारवासारव
- ‘उद्धवजी… नाकाने कांदे सोलू नका… मराठा समाजाच्या हिताची भूमिका घ्या’
- अंकिता लोखंडेचा चाहत्यांना ‘गुड बाय’ ; पोस्ट शेअर करत दिली माहिती


