Share

पवारांमुळे आरक्षण मिळालं नाही हे पडळकरांचं म्हणणं योग्यच आहे – पाटील

Published On: 

पुणे – ओबीसी आरक्षणाच्या बाबत सुरु असलेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवार आरक्षण प्रश्नाला जबाबदार असल्याचे म्हटले होते. यानंतर आता प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील पडळकर यांच्या सुरात सूर मिसळला आहे.

शरद पवार हे सर्वांचे गॅाडफादर आहेत. महाविकास आघाडीत सगळे त्यांचे ऐकतात. त्यामुळे कोणत्याही निर्णयाचा दोष त्यांच्यावर जाणारच असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुण्यात अनाथ मुलांना साहित्य वाटप करण्यात आलं. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “गोपीचंद पडळकरांनी काही भूमिका मांडली आहे. पवार सगळ्यांचे गॅाडफादर आहेत. तसं म्हटल्यानंतर त्यांच्यावर दोष जातो. माझी डिबेट करायची तयारी आहे. मी निकाल वाचला. त्यात पावला-पावलावर जाणवतंय की चुका आहेत. ॲार्डिनन्सचा कायदा केला नाही” असे ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!